28 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home लातूर लातूर जिल्ह्यात ५० नवे बाधित

लातूर जिल्ह्यात ५० नवे बाधित

एकमत ऑनलाईन

लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ५० नव्या रुग्णांची भर पडली आहे़ बुधवार दि़ २ डिसेंबर रोजी एकूण ५० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्यानंतर आता जिल्ह्यात एकूण ३६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, आज तिघांचा उपचारादरम्यान बळी गेल्याने मृतांची संख्या ६५० एवढी झाली आहे.

मंगळवारच्या तुलनेत ही संख्या किंचित वाढली असून, मंगळवारी ५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव रुग्णसंख्या ३६१ वर गेली आहे़ आज रिकव्हरी रेटमध्ये वाढ झाली असून, ९५.३८ असा नोंदला गेला. जिल्ह्यात आज १४८ आरटीपीसीआर, तर ३४७ रॅपिड अ‍ँटिजन टेस्ट करण्यात आल्या. यात आरटीपीसीआरमधील १९, तर रॅपिड अ‍ँटिजनमधील ३१ असे एकूण ५० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१ हजार ९२६ झाली असून, यापैकी २० हजार ९१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

‘जाकीर’संस्थेच्या मदतीमुळे वाचले मनोरुग्णाचे प्राण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या