लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ५३ नव्या रुग्णांची भर पडली आहे़ गुरूवार दि़ ३ डिसेंबर रोजी एकूण ५३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्यानंतर आता जिल्ह्यात एकूण ३५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, आज तिघांचा उपचारादरम्यान बळी गेल्याने मृतांची संख्या ६५० एवढी झाली आहे़
बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कोरोनामुक्तांची संख्या वाढली असून, ५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव रुग्णसंख्या ३५४ वर गेली आहे़ आज रिकव्हरी रेटमध्ये वाढ झाली असून, ९५.४२ असा नोंदला गेला. जिल्ह्यात आज २१२ आरटीपीसीआर, तर ४१५ रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या. यात आरटीपीसीआरमधील १९, तर रॅपिड अँटिजनमधील ३४ असे एकूण ५३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१ हजार ९७९ झाली असून, यापैकी २० हजार ९७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
उदगीर येथे वाळू माफियांंचा वाढला हैदोस