23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeलातूरमांजरा नदीवरील बराजमध्ये ५४.४४ दलघमी पाणीसाठा

मांजरा नदीवरील बराजमध्ये ५४.४४ दलघमी पाणीसाठा

एकमत ऑनलाईन

लातूर (एजाज शेख ) : मांजरेच्या वाहत्या पाण्याला दूथडी अडवून उभय तिरावरील तृषार्त भूमीला सुजलाम् सुफलाम् करण्याचे अभिनव स्वप्न विकासरत्न विलासराव देशमुख यांनी पाहिले आणि ते स्वप्न साकारले गेल्याने मांजरा नदीवरील बराज आजघडीला शेतक-यांसाठी शाश्वत स्त्रोत बनले आहेत. मांजरा नदीवरील १५ बराजेस्मध्ये उपयुक्त पाणीसाठा ५४.४४ दशलक्षघनमीटर लघमी म्हणजेच ८९.४४ टक्के पाणी साठले आहे. बराजेसची शृंखला जलमय झाल्याने सिंचन क्षेत्रात सुमारे १२ हजार हेक्टरपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

मांजरा नदीवरील बराजमधील पाणीसाठा पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे पाणीसाठ्याच्या टक्केवारीची आहेत. लासरा बराजमध्ये १.१३६ दलघमी (३७.८७), बोरगाव अंजनपूर-१.०७० (७०.८६), टाकळगाव देवळा- १.४९२ (७७.८७), वांजरखेडा-३.०६०(८५.००), वांगदरी-.०.७५७ (८९.८०), कारसा पोहरेगाव-३.०९२ (९०.६८), नागझरी-३.१८५ (९१.३७), साई- २.९१० (८३.८६), खुलगापूर- ८.३३० (८५.६५), शिवणी- ८.८९७(९०.६९), बिंदगीहाळ- १.१५०(८५.१९), डोंंगरगाव-६.९३० (८७.७६), धनेगाव- ९.२८७(८२.११), होसूर-१.८०८ (८०.३६) व भूसणी बराज(तावरजा नदी)-१.३३३ (८९.४४ दलघमी). मांजरा नदीवरील या १५ बराजमध्ये ५४.४४ दशलक्षघनमीटर पाणीसाठा आहे.

विकासरत्न विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी लातूर शहर व परिसरातील पाणीपुरवठा योजनेसाठी शाश्वत स्त्रोताच्या निश्चितीकरणासाठी उच्चाधिकारी समितीची नियुक्ती केली होती. उच्चाधिकार समितीने मांजरा नदीवर मांजरा धरणाच्या खालील बाजूस १००.०३ दलघमी पाणी उपलब्ध केल्यानूसार बोरगाव-अंजनपूर, वांजरखेडा, कारसा-पोहरेगांव, खुलगापूर, डोंगरगाव, धनेगाव येथे सहा बंधारे व तावरजा नदीवर भूसणी येथे एक असे एकुण सात बंधा-यांसाठी एकुण ७७.२३ दलघमी पाण्धाी वापरण्याचे प्रस्तावित केले होते.

उच्चाधिकार समितीने प्रस्तावित केलेल्या पाण्याचे प्रत्यक्ष पाणीवापराचे फेरनियोजन करुन मांजरा नदीवर साई-महापूर, शिवणी, टाकळगाव-देवळा, होसून तालुका निलंगा तसेच लासरा तालुका कळंब येथे नवीन बॅरेजेस् प्रस्तावित करण्यात आले होते. मांजरा खो-यात अनियमित व अवेळी पडणारा पाऊस यामुळे कोल्हापूरी बंधा-यांमध्ये मनुष्यबळाने वाहत्या पाण्यामध्ये दरवाजे टाकण्याचे जिकिरीचे व अडचणीचे काम होते. कोल्हापूरी बंधा-यांमध्ये अपेक्षीत पाणीसाठा करता येत नव्हता. त्यामुळे परीसरात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते.

ही बाब लक्षात घेता कोल्हापूरी पद्धतीच्या बंधा-यांच्याद्वारांमध्ये नवीन तांत्रिक सुधारणा करुन बॅरेजेप्रमाणे उभ्या उचल पद्धतीचे विद्युत संचलीतद्वारे बसवून बॅरेजेमध्ये रुपांतर करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यास मंजूरी मिळाली आणि महाराष्ट्रात प्रथमच मांजरा नदीवरील बिंदगीहाळ, नागझरी, वांगदरी या तीन कोल्हापूरी बंधा-यांचे बॅरेजच्या धर्तीवर रुपांतर करण्यात आले. त्यामुळे बंधा-यांमध्ये पुर्ण क्षमतेने १०० टक्के पाणीसाठ्याची शाश्वत स्त्रोताची निर्मिती होऊन ९९३ हेक्टर सिंचन क्षेत्र पुर्नस्थापीत झाले आहे. त्याचा लाभ शेतक-यांना मिळत आहे.

तेरणेच्या बराजमध्ये ७.७३६ तर रेणाच्या बराजमध्ये ०.६०२ पाणीसाठा
तेरणा नदीवरील राजेगाव, किल्लारी क्र. २, मदनसूरी, गुंजरगा, औराद शाहजनी, तगरखेडा या सात बराजमध्ये ७.७३६ दशलक्षघनमीटर पााणीसाठा आहे तर रेणा नदीवरील घनसरगाव, रेणापूर व खरोळा बराजमध्ये ०.६०२ दशलक्षघनमीटर पाणीसाठा आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या