24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूर‘लम्पी’ची ५६ पशुधनास झाली बाधा

‘लम्पी’ची ५६ पशुधनास झाली बाधा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
कोरोना विषाणूची लाट कांही प्रमाणात ओसरली असतानाच आता पशुधनाला विषाणुजन्य आजार असलेला लम्पी स्कीन रोग हा होत आहे. नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याच्या बरोबरच आपल्या पशुधनाच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. लातूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात लम्पी स्कीन रोग पसरला असून आजपर्यंत ५६ बाधीत पशुधन आढळले असून यात प्रामुख्याने गाय, बैल वर्गीचा समावेश आहे.

जिल्ह्यात लम्पी रोगाचा फैलाव ३० ऑगस्ट पासून जिल्ह्यात सुरू झाला आहे. गेल्या आठ दिवसात जनावरे बाधीत होण्याचे प्रमाण वाढत आहे. जनावरांच्या अंगावर बसणा-या चाव-या माशापासून या रोगाचा प्रसार होत आहे. अद्रता व दमट वातावरणात तसेच बाधित जनावरांना चांगल्या जनावरांशी संपर्क आल्यामुळे संसर्ग होऊन या रोगाचा अधिक गतीने फैलाव होत आहे. हा आजार गाय, बैल व म्हैस वर्गामध्ये जास्त प्रमाणात आढळून येत आहे. या रोगामध्ये पशुधनाच्या अंगावर गाठी येणे, ताप येणे, पायावर व पोळीवर सुज येणे, अशी लक्षणे दिसुन येतात. त्यामुळे दूध उत्पादन घटते. या आजारामुळे पशुधानाच्या अंगावरील गाठी फूटून देखणे पशुधन विद्रुप होऊ शकते. त्यामुळे पशुधनास लम्पीचा आजार होऊच नये, जर झाला तर त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

नांदेड जिल्ह्याच्या सिमा लगतच्या भागातून लातूर जिल्ह्यात लम्पी स्कीन रोगाची पहिली लाट सप्टेंबर २०२० मध्ये आली होती. त्यानंतर यावर्षी ऑगस्ट मध्ये लम्पीचा पहिले पशुधन निदर्शनास आले. लातूर जिल्ह्यातील निलंगा, रेणापूर, औसा, अहमदपूर व लातूर तालुक्यातील गावामधील ५६ जनावरे लम्पी आजाराने बाधीत झाली आहेत. या गावा लगतच्या ५ किलोमिटर परिसरात २२ हजार पशुधन आहे. या परिसरत असलेल्या लम्पी स्कीन विषाणूजन्य रोगावर नियंत्रण करण्यासाठी लसीकरण मोहिम हाती घेतली असून ५ हजार २०० पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे. या बरोबरच रोगाचा फैलाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पोस्टर, कार्नर बैठकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. पशुधनाची काळजी घेण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली टास्ट फोर्स गटीत केली आहे. तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी गोयल यांनी गटविकास अधिकका-यांना गावामध्ये औषध फवारणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या