24 C
Latur
Monday, June 21, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यात ५९ नवे रुग्ण

लातूर जिल्ह्यात ५९ नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असून, दोन दिवसांपासून १०० च्या आत असलेली नव्या रुग्णांची संख्या शनिवार दि़ २४ आॅक्टोबर रोजी ५९ एवढी नोंद झाली़ याच बरोबर जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या हजाराच्या आत आली असून, आता फक्त ९२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १९ हजार ८७८ एवढी झाली आहे, तर आज एकाही बाधितांचा मृत्यू न झाल्याने मृतांची संख्या ५८८ स्थिरावली आहे़ दरम्यान, १०९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

जिल्ह्यात आज ९३ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या असून, १४ नवे रुग्ण आढळले आहेत़ तर, २९१ रॅपिड अँटिजन चाचण्यांत ४५ असे दोन्ही मिळून ५९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत़ जिल्ह्यात बाधित रुग्णांचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत घटले असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात उपचार घेत असलेली रुग्णसंख्या हजाराच्या आत आली आहे़ जिल्ह्यात एकूण १९ हजार ८७८ रुग्णांपैकी १८ हजार ३६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत़

रिकव्हरी रेट ९२.३९ वर
सतत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे़ शनिवारी जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९२़३९ इतका नोंदविण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या