24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeलातूर५९५ व्यक्ती घेताहेत घरातच उपचार

५९५ व्यक्ती घेताहेत घरातच उपचार

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा मिटर वेगात पळत आहे. जिल्ह्यात आजघडीला एकुण बाधितांचा आकडा ११ हजार ६२९ वर पोहोचला आहे. असे असले तरी ८ हजार २७० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत तर सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्ती आता घरातच उपचार घेऊन बरे होत आहेत. सध्या जिल्ह्यात ५९५ व्यक्ती घरातच उपचार घेत आहेत. या गृह विलगीकरणामुळे कोरोना बाधितांचा पैसा तर वाचतोच आहे शिवाय आत्मविश्वासासह आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी होतण्यास मदत होत आहे. या संदर्भात लातूर महापालिकेच्या वतीने एक माहिती पुस्तिका काढून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय भर पडत चालली आहे. आतापर्यंत ११ हजार ६२९ जणांना याची लागण झाली आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी गृह विलगीकरणाची मुभा शासनाने गेल्या महिन्यात दिली. त्यासाठी रुग्णाच्या घरी तशी व्यवस्था असणे गरजेचे आहे. तरच गृह विलगीकरणामध्ये राहून घरातच उपचार घेऊन कोरोनावर मात करता येणार आहे. घरातच राहून उपचार घेताना काळजीही तितकीच घेणे महत्वाचे आहे. सध्या लातूर जिल्ह्यात ५९५ व्यक्ती गृह विलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत. लातूर महानालिकेनेदेखील गृह विलगीकरणासंदर्भात एक महिती पुस्तिका काढून प्रबोधन करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. गृह विलगीकरणामध्ये उचार घेणा-यांची संख्या वाढली तर आरोग्य यंत्रणेवरील मोठा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

गृह विलगीकरणासाठी कोरोना रुग्णासाठी घरात खेळती हवा असावी. स्वतंत्र स्वच्छतागृह असलेली खोली असावी. रुग्णाची काळजी घेणारी घरात एक व्यक्ती असावी, घरात ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाची, गर्भवती किंवा कर्करोग, तीव्र दमा, श्वसनविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, -हदयविकार, मुत्रपिंढाचाविकार, असे गंभीर रुग्ण असू नयेत. असे रुग्ण असल्यास कोरोनाचा रुग्ण बरा होईपर्यंत अशा रुग्णांची इतरस्त्र व्यवस्था करावी. कोरोनाच्या रुग्णाने इतरस्त्र फिरु नये. त्याचा इतरांना संसर्ग होऊ शकतो. रुग्णाची भांडी, टॉवेल, अशा वैयक्तिक वापराच्या वस्तू कुटूंबातील इतर व्यक्तिींनी वापरु नयेत. रोज दोनवेळा १५ ते २० मिनीटे गरम पाण्याची वाफ घ्यावी, रुग्णाला जेवण त्याच्या खोलीबाहेर एखाद्या स्टूवर किंवा टेबलावर ठेवावे. रुग्णाची खोली, स्नानगृह दिवसातून एकदा स्वच्छ व निर्जंतुकीकरण करावे.

गृह विलगीकरणाच्या तीन पाय-या
आरोग्य कर्मचा-यांचे पथक घरी भेट देऊन रुग्णाच्या तब्येतीची माहिती घेणार. निवासस्थानाची पाहणी करुन गृह विलगीकरण करता येईल का, याची माहिती देणार.

गृह विलगीकरणासाठी रुग्ण सक्षम असल्यास रुग्णाला दुरध्वनीवरुन प्रशिक्षण दिले जाणार. पुढील दहा दिवस तब्येतीची रोज दुरध्वनीवरुन माहिती घेतली जाणार.

रुग्णाची पॉझिटिव्ह चाचणी आल्यानंतर दहा दिवसांनी व शेवटच्या तीन दिवसांत ताप किंवा अन्य लक्षणे नसल्यास रुग्ण गृह विलगीकरण संपवू शकतो. यासंदर्भात दुरध्वनीवरुन सूचना दिली जाणार. रुग्णाने त्यानंतर सात दिवस घरातच राहून स्वत:च्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे.

निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण, भाजप आक्रमक !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या