19.2 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeलातूरलातुरात आज पाचवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद

लातुरात आज पाचवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी बौध्द धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व सर्व लातूर येथील बौध्द उपासक उपासिका यांच्या सौजन्याने लातूर-बार्शी रोडवरील रामेगाव येथील महाविहार, सातकर्णीनगर येथे आज दि. २५ डिसेबर रोजी दुपारी १२ वाजता संस्थेचे अध्यक्ष भिक्खु डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवी अखिल भारतीय बौध्द धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे.

आज सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लातूर येथे पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहनानंतर धार्मिक देखावे व बुद्ध मूर्ती सहित भिख्खु संघ व उपासक-उपासिका यांच्या धम्म मिरवणुकीस प्रारंभ होईल. ही मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून प्रारंभ होऊन छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक, गंजगोलाई, हनुमान चौक, बस स्टँड समोर, महात्मा गांधी चौक ते डॉ .बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे त्याचा समारोप होईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे भिक्खू डॉ. इंदवंस महाथेरो (कुशीनगर, उत्तर प्रदेश) यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मुख्य ध्वजारोहण होईल.

धम्म परिषदेचे उद्घाटन भिक्खू सुगतवंश महाथेरो (श्रीलंका) यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिक्खू धम्मसेवक महाथेरो, अध्यक्ष, अखिल भारतीय भिक्खू संघ शाखा, महाराष्ट्र प्रदेश, (मुळावा) तर मार्गदर्शक म्हणून भिक्खू डॉ.उ पगुप्त महाथेरो, अध्यक्ष, बौध्द धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, लातूर, प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुधाकर शृंगारे, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार धीरज विलासराव देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, सत्कारमूर्ती निलेश गायकवाड (आयपीएस), समाज कल्याण विभाग लातूरचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, राज्य परिवहन लातूरचे विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव, जिल्हा परिषदेचे सदस्य धनंजय देशमुख, सरपंच साधना पांडुरंग मगर आणि संयोजक भिक्खू पय्यानंद थेरो यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच सातकर्णी स्मरणिकेचे
विमोचन भिक्खू प्रा. डॉ. एम. सत्यपाल महाराज महाथेरो (औरंगाबाद) यांच्या हस्ते होईल.

त्यानंतर भिक्खू शरणानंद महाथेरो (पाथरी), भिक्खू प्रा. डॉ.खेमधम्मो महाथेरो (मुळावा), भिक्खू डॉ. यशकाश्यपायन महाथेरो (जयंिसगपूर), भिक्खू दयानंद महाथेरो (मुळावा), भिक्खू पय्यातीस्स महाथेरो (शिरसाळा), भिक्खू धम्मनाग थेरो, (हत्याळ, कर्नाटक), भिक्खू करुणानंद थेरो (औरंगाबाद), भिक्खू धम्मानंद थेरो (अनदूर, कर्नाटक), भिक्खू ज्ञानरक्षित थेरो (औरंगाबाद), भिक्खू प्रशिलरत्न गौतम थेरो (गुजरात), भिक्खू धम्मज्योती (औरंगाबाद), भिक्खू धम्म बोधि (औरंगाबाद), भिक्खू पय्यारत्न थेरो (नांदेड), भिक्खू महावीरो थेरो (काळेगाव, अहमदपूर), भिक्खू मुदितानंद थेरो, (परभणी), भिक्खू पय्याबोंथी (खुरगाव, नांदेड), भिक्खू धम्मधर (जालना), भिक्खू सुभूती थेरो (नांदेड), भिक्खू शिलरत्न थेरो (नांदेड), भिक्खू संघपाल थेरो (नांदेड), भिक्खू अश्वजीत थेरो (दाभड, नांदेड), भिक्खू नागसेन (औरंगाबाद), भिक्खू विनयशील (लातूर), भिक्खू नागसेन बोधि (उदगीर), भिक्खू बोधि धम्मा (बेंगलोर), भिक्खू सुमेध नागसेन (बुद्ध लेणी, खरोसा), भिक्खू धम्मसार (किल्लारी), भिक्खू नागसेन सध्दारतन (श्रीलंका), भिक्खू रेवतबोधि (ंिजतूर), भिक्खू संघप्रिय (नांदेड), भंते पय्यावस (पूर्णा), भंते संघरत्न (देवगाव फाटा, सेलू), भंते बुद्धभूषण (दाभड, नांदेड), भंते बुद्धशील (महाविहार, लातूर) आणि भंते इंदवंस (महाविहार, लातूर) यांची धम्मदेसना होईल.

तसेच सायंकाळी ७ वाजता मी वादळवारा फेम अनिरुद्ध वनकर यांचा भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी या धम्मपरिषदेत पांढरे शुभ्र वस्र परिधान करुन उपस्थित राहुन धम्म परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिषदेचे संयोजक भिक्खू पय्यानंद थेरो, सर्व बौद्ध उपासक-उपासिका, प्राध्यापक, डॉक्टर्स, इंजिनियर्स, पत्रकार, वकील संघ, आंबेडकरी पक्ष, संघटना कार्यकर्ते, आजी-माजी मनपा व जि. प. सदस्य, महिला मंडळ, भारतीय बौद्ध महासभा, बौद्ध धम्म परिषद कार्यकारणी, स्वयंसेवी संस्था पदाधिकारी व कार्यकर्ते आणि संयोजन समितीतील सर्व सदस्य यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या