23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूरनिलंग्यात 6 कोरोना पॉजिटीव्ह आढळले

निलंग्यात 6 कोरोना पॉजिटीव्ह आढळले

एकमत ऑनलाईन

सर्व रुग्ण निलंगा तालुक्यातील : 18 मे रोजी एकुण 118 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते

लातूर : लातूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता वाढत चालला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील 6 रुग्ण आज कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे तपासणी अंती स्पष्ट झाले आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर जळकोट चाकूर आणि आता निलंगा तालुक्यात रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येत आहे

येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज 18 मे रोजी एकुण 118 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 9 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी सर्वच 9 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 3 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी सर्वच 3 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले.

पुनर्तपासणी करण्यात येणार

निलंगा येथुन 8 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 2 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, चाकुर येथुन 2, अहमदपुर येथुन एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लातुर जिल्हयातील असे एकुण 23 स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 06 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह असुन 17व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तसेच बीड जिल्हयातील 77 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 73 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत व 2 व्यक्तींचे अहवाल इनकंक्लुझिव्ह आले असल्यामुळे त्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.

18 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते

उस्मानाबाद जिल्हयातील 18 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी16 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे इनकंक्लुझिव्ह आले असल्यामुळे त्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. असे एकुण आज 118 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन 04 व्यक्तींचे अहवाल इनकंक्लुझिव्ह आले असून 106 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या