22.7 C
Latur
Wednesday, August 12, 2020
Home लातूर लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी ६ मृत्यू

लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी ६ मृत्यू

एकमत ऑनलाईन

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १२१ वर : लातूरकरांची चिंता वाढली, ७६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने सुटी

लातूर : लातूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, मागच्या तीन दिवसांपासून १०० पेक्षा जास्त रुग्णांची भर पडत असल्याने लातूरकरांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल १२१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये गुरुवारी तपासणीसाठी आलेल्या स्वॅबमधून ७६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर रॅपिड अ‍ँटीजन टेस्टमधून जिल्ह्यात ४५ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णसंख्येत मोठी भर पडली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात आणखी ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९५ वर पोहोचला आहे.

मृतांची संख्या वेगाने वाढू लागल्याने जिल्ह्याचा मृत्यूदर ४.४ वर पोहोचला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे शुक्रवारी ७६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातून काल ४०५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी २७८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर ७६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच ४२ जणांचा अहवाल अनिर्णित, ५ जणांचा अहवाल प्रलंबित, तर ४ जणांचा अहवाल रद्द करण्यात आला. तसेच जिल्ह्यात आज झालेल्या ४७० जणांच्या रॅपिड अ‍ँटीजन टेस्टमध्ये ४५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, तर ४२५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे आज जिल्ह्यात तब्बल १२१ रुग्ण वाढले. यापैकी ११५ पॉझिटिव्ह रुग्ण हे अन्य पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील आहेत, तर ६ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २१२८ झाली असून, यापैकी १२५६ रुग्ण बरे झाले आहेत, तर ५०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि मृतांचा आकडा ९५ वर पोहोचला आहे.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक ४८ रुग्ण लातूर तालुक्यातील असून, रायवाडी, धनेगाव येथे प्रत्येकी २ आणि भातागळी येथील १ रुग्ण वगळता सर्व रुग्ण शहरातील आहेत. उदगीर तालुक्यातही तब्बल २२ रुग्ण आढळले. त्यात आंबेडकर सोसायटी ३, भागीरथीनगर-२, नांदेडरोड २ यासह शहर आणि तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. औसा तालुक्यात ८ रुग्ण सापडले असून, होळी ३, काझी मोहल्ला २, किल्लारी २ यासह अन्य एक रुग्ण वाढला आहे. देवणी तालुक्यातही आज ७ रुग्ण आढळले. त्यात सर्वाधिक ५ रुग्ण तळेगाव येथील आहेत. निलंगा तालुक्यातही ११ रुग्ण सापडले असून, दापका-२, औराद शहाजानी १, विद्यानगर-२ यासह सर्व रुग्ण शहरातील आहेत. चाकूर तालुक्यातही ९ रुग्ण सापडले असून, सर्वाधिक ७ रुग्ण नळेगाव येथील, तर २ रुग्ण चाकूर शहरातील आहेत. याशिवाय अहमदपूर तालुक्यातही ५ रुग्ण सापडले असून, हडोळती येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. यासोबतच शिरुर अनंतपाळ येथे तब्बल १० रुग्ण आणि रेणापूर येथे १ रुग्ण सापडला.

शहरातील नवे रुग्ण या भागातील

हरिभाऊनगर-५, मळवटी रोड-४, जिल्हा कारागृह-३, जीएमसी रोड-३, बोधेनगर-२, सम्राट चौक-२, मजगेनगर-२, गंगासागर रेसीडेन्सी-२, रायवाडी-२, धनेगाव-२, दीपज्योतीनगर, गौसपुरा गल्ली, माताजीनगर, हमाल गल्ली, एलआयसी कॉलनी, १२ नंबर पाटी, तेली गल्ली, बालेपीर गल्ली, सीतारामनगर, सिग्नल कॅम्प, विशालनगर, शिवाजीनगर, गजानननगर, तिरुपतीनगर, मुस्तफानगर, आनंदनगर, मोतीनगर, यशवंतनगर, शासकीय वसाहत आदी भागातील रुग्ण आहेत.

Read More  लातुरात पुनश्च लॉकडाऊन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,143FansLike
101FollowersFollow