27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूर६० लाख मे. टन ऊसाचे विक्रमी गाळप

६० लाख मे. टन ऊसाचे विक्रमी गाळप

एकमत ऑनलाईन

लातूर : योगीराज पिसाळ
लातूर जिल्हयात गेल्यावर्षी झालेल्या दमदार पाऊसामुळे ऊसाचे पिकही चांगले आले होते. यावर्षी गेल्या आठ महिण्यात जिल्हयातील पाच सहकारी व पाच खाजगी साखर कारखाण्यांनी ५९ लाख ७९ हजार ७०० मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ६३ लाख ६३ हजार ९१० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर जिल्हयाचा साखर उतारा १०.६४ असा राहिला आहे. त्यामुळे यावर्षी ऊसाचे विक्रमी गाळप झाले आहे.

जिल्हयात गेल्या दोन वर्षापासून सरसरी पेक्षा अधिक पाऊस होत आहे. जिल्हयातीलशेतकरी ऊस पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहतात. या पिकांच्यामुळे शेतक-यांचे जिवनमान उंचावत आहे. शेतक-यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करत गेल्या वर्षभरात ठिबक सिंचनाद्वारे ५६ हजार ७८४ हेक्टर क्षेत्रावरील ऊसाचे पीक जोपासले होते. जिल्हयात १ नोव्हेंबरपासून ५ सहकारी व ५ खासगी साखर कारखान्यांनी ऊस तोडणी हंगाम सुरू केला होता. तो दि. १२ जून पर्यंत चालला.

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याने ८ लाख ५९ हजार ९६९ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ८ लाख ९० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर १०.३५ असा साखर उतारा आला आहे. विलास सहकारी साखर कारखान्याने ७ लाख ६३ हजार ४१७ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ८ लाख ६१ हजार ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर ११.२८ साखर उतारा आला आहे. विलास २ या साखर कारखान्याने ५ लाख ३७ हजार ५६ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ६ लाख ५५ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले.

१२.२ साखर उतारा राहिला आहे. संत शिरोमनी मारूती महाराज सहकारी साखर कारखान्याने २ लाख ६६० मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून २ लाख ८ हजार ९१० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. साखर उतारा १०.४१ साखर उतारा राहिला आहे. रेणा सहकारी साखर कारखान्याने ६ लाख ३८ हजार ६५९ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ६ लाख ६० हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. साखर उतारा १०.३४ साखर उतारा राहिला आहे. सिध्दी शुगर लि. या साखर कारखान्याने ६ लाख ५३ हजार ६१५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ६ लाख ३५ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ९.७२ असा साखर उतारा राहिला आहे. श्री साईबाबा शुगर लि. या साखर कारखान्याने २ लाख ११ हजार ६८२ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून २ लाख ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर साखर उतारा ९.४७ असा साखर उतारा राहिला आहे.

जागृती शुगरने ७ लाख १४ हजार २८४ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ७ लाख ४० हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. १०.३७ असा साखर उतारा राहिला आहे. ट्वैटीवन शुगरने १२ लाख १८ हजार ६६५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून १३ लाख ५२ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. ११.१ असा साखर उतारा राहिला आहे. तर पन्नगेश्वर शुगरने १ लाख ८१ हजार ६९३ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून १ लाख ५९ हजार ५० क्विंटल साखेरचे उत्पादन केले आहे. तर साखर उतारा ८.७५ असा राहिला आहे.

विलास २ चा सर्वाधिक साखर उतारा
जिल्हयात यावर्षी ११ जून पर्यंत ऊसाचे विक्रमी गाळप झाले आहे. ऊस गाळपात सर्वांधिक साखर उतारा विलास २ या साखर कारखान्याचा १२.२ राहिला आहे. त्या पाठोपाठ विलास सहकारी साखर कारखान्याचा ११.२८ असा राहिला आहे. तर ट्वैटीवन शुगरचा ११.१ असा राहिला आहे.

सहकारी साखर कारखान्यांचे सर्वाधिक गाळप
लातूर जिल्हयात यावर्षी पाच सहकारी व पाच खाजगी साखर कारखाण्यांनी ऊसाचा गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली आहे. यात पाच सहकारी साखर कारखान्यांनी २९ लाख ९९ हजार ७६१ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ३२ लाख ७६ हजार १० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर पाच खाजगी साखर कारखान्यांनी २९ लाख ७९ हजार ९३९ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ३० लाख ८७ लाख ९०० क्ंिवटल साखरेचे उत्पादन केले आहे. सहकारी साखर कारखान्यांचा साखर उतारा १०.९२ असा राहिला. तर खाजगी साखर कारखान्यांचा १०.३६ असा साखर उतारा राहिला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या