25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeलातूरवार्षिक सरासरीच्या ६०.१ टक्के पाऊस

वार्षिक सरासरीच्या ६०.१ टक्के पाऊस

एकमत ऑनलाईन

लातूर : गेल्या चार-पाच दिवसांपासून लातूर जिल्ह्यात सरीवर सरी बसरत आहेत. दि. १९ जुलैपासून पावसाचा जोर वाढला आहे. बुधवार व गुरुवार या दोन दिवसांत भीज पाऊस झाला. हा पाऊस संपुर्ण जिल्हाभर सर्वदुर होता. या मोसमातील एकुण पाऊस ४२४.३ मि. मी. झाला आहे. वार्षिक सरासरीच्या ६०.१ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

लातूर शहर आणि जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये बुधवारपासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे संपूर्ण जिल्हा चिंब झाला आहे. लातूरच्या पुर्व भागातील बाभळगाव, धनेगाव, बोरी, सलगरा, महाराणा प्रतापनगर, कोळपा, ममदापूर, भातांगळी, भडी आदी ५० ते ६० गावांमध्ये ढगफुटी व्हावी, असा पाऊस झाला. परिणामी शेत-शिवार पाण्याखाली गेले. पिकांचे मोठे नुकसान झाले. ठिकठिकाणी शेतांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. जळकोट, उदगीर, देवणी, अहमदपूर, चाकुर, शिरुर अनंतपाळ, रेणापूर आदी तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. पावसाच्या सरीवर सरी कोसळल्याने बुधवार आणि गुरुवारी सूर्यदर्शनही झाले नव्हते.

बुधवार व गुरुवारच्या दिवसरात्र झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भूजलाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. नदी-नाले, ओढे वाहत आहेत. जिल्ह्यातील दहाही तालुक्यांत जमदार पाऊस झाला आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या केज तालुक्यातील मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवार आणि गुरुवारी झालेल्या पावसाने धरणातील पाणीसाठ्यात ६ दशलक्षघनमीटर एवढ्या पाण्याची वाढ झाली आहे. लातूर तालु्क्यातील नागझरी येथील बराजला भरपूर पाणी आले आहे. नागझरी बराजमध्ये ८० टक्के पाणी साठवण करुन उर्वरीत पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे नागझरी बराजमधून सोडलेले पाणी साई बराजमध्ये आले आहे. पावसात सातत्य राहिले तर साई बराजही ८० टक्के भरल्यानंतर त्याही बराजमधून नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल. अशा पद्धतीने मांजरा नदीवरील बराजची शृंखला जलमय होण्याची प्रक्रिया या पावसामुळे सुरु झाली आहे.

जळकोट तालुक्यात सर्वाधिक पाऊस
शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जळकोट तालुक्यात सर्वाधिक ११.४ मी. मी पावसाची नोंद झाली आहे. लातूर तालुक्यात ४.४, औसा तालुक्यात ३.८, अहमदपूर तालुक्यात ७.६, निलंगा तालुक्यात ५.१, उदगीर तालुक्यात ७.५, चाकुर तालुक्यात ८.२, रेणापूर तालुक्यात ४.६, देवणी तालुक्यात ५.३, शिरुर अनंतपाळ तालुक्यात ३.८ तर जळकोट तालुक्यात ११.४ मी. मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात एकुण ५.८ मि. मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे हरडफ गावचा संपर्क तुटला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या