30.8 C
Latur
Friday, March 5, 2021
Home लातूर ६०० रुग्णांचा घरुनच कोरोनाशी लढा

६०० रुग्णांचा घरुनच कोरोनाशी लढा

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण आता कमी होत असून कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. दरम्यान सध्या उपचार सुरु असलेल्या १ हजार १२२ रुग्णांपैकी ६०० घरुनच कोरोनाशी लढा देत आहेत. ५२२ रुग्णांवर शासनाच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. आजपर्यंतची लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १९ हजार ५८२ असून त्यापैकी १७ हजार ८८२ रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी गेले आहेत.

लातूर जिल्ह्यात एप्रिलमध्ये १६, मे महिन्यात ११९, जुनमध्ये २१४, जुलैमध्ये १८५१, ऑगस्ट महिन्यात ५९११, सप्टेंबरमध्ये ९१८८ तर ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत ३१७६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. आता मात्र जिल्ह्यात कोरोना साथीचा प्रसार दिवसेंदिवस आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ५ हजार २४५ रॅपीड अँटिजेन व आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. ७० हजार ४८३ रॅपीड अँटिजेन टेस्टमध्ये १२ हजार १२८ पॉझिटीव्ह तर ३५ हजार ३४६ आरटीपीसीआर टेस्टमध्ये ६ हजार ७३८ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सध्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या ५२२ रुग्णांपैकी ८ मॅकॅनिकल व्हेंटीलेटवर, बायपॅप व्हेंटीलेटरवर १९ तर १५६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. उर्वरीत रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये आहेत.

लातूर जिल्ह्यातील विविध ३२ कोविड केअर सेंटरमध्ये ४ हजार ७७० खाटा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. माता आता कोरोनाचा आलेख उतरणीला लागला तर दुसरीकडे गृहविलगीकरणास प्राधान्य दिले जात असल्यामुळे कोविड केअर सेेंटरमधील रुग्णांची संख्या कमी झालेली दिसून येते. जिल्ह्यात एकुण ४ हजार ७७० खाटा उपब्ध असल्यातरी सध्या केवळ ५२४ रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असल्यामुळे ४ हजार १६८ खाटा शिल्लक आहेत.

गेल्या सात महिन्यांत लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १९ हजार ५८२ पर्यंत गेला आहे. त्यापैकी १७ हजार ५८२ रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत ५७८ जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये कोमोर्बिलिटी असलेल्या ४२७ तर कोमोर्बिलिटी नसलेल्या १५१ जणांचा समावेश आहे. ७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या २३१, ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या १७७, ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ९० तर ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ८० जणांचा ५७८ मृतांमध्ये समवेश आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आता ३० पर्यंत
कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील आजुबाजूच्या २० जणांच्या तपासण्या पूर्वी केल्या जात असत. आता ही संख्या ३० वर नेण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास त्याच्या कॉन्टॅक्टमधील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या तपासण्या करुन कोरोनावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्ते व पुलांची तातडीने दुरुस्ती करा !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या