22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeलातूरमांजरा नदीवरील १४ बराजमध्ये ६१.२६ टक्के पाणीसाठा

मांजरा नदीवरील १४ बराजमध्ये ६१.२६ टक्के पाणीसाठा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात सलग पाच दिवस झालेल्या संततधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मांजरा नदीवरील १५ पैकी १४ बराजमध्ये ६१.२६ टक्के पाणीसाठा झाला आहे. बोरगाव अंजनपुर बंधा-यात मात्र पाणीसाठा निरंक आहे. या १५ बराजचा प्रकल्पीय पााणीसाठा ६४.८४६ दलघमी असून सध्या या बराजेस्मध्ये ३९.७२ दलघमी पाणीसाठा आहे. जिल्ह्यात पाच दिवस सातत्याने पाऊस पडला. मांजरा, तरेणा, तावरजा व रेणा नदींच्या परिसरात पावसाची दमदार हजेरी राहिली. त्यामुळे या नद्यांवरील बराजची शृंखला जलमय झाली आहे. त्यामुळे मांजरा नदीवरील १२, तावरजा नदीवरील एक ते दोन दरवाजे उघडून पाणी नदीच्या पात्रात सोडून देण्यात आले. मांजरा नदीच्या पात्रात पाणीच पाणी झाले आहे.

परिणामी पाटबंधारे विभागाला या नदीवरील लासरा, टाकळगाव, वांजरखेडा, वांगदरी, कारसा, पोहरेगाव, नागझरी, साई, शिवणी, बिंदगीहाळ, डोंगरगाव, धनेगाव, होसून या १२ बराजचे एक ते दोन दरवाजे उघडून पाणी नदीच्या पात्रात सोडून देण्यात आले आहे. तावरजा नदीवरील भुसणी बराज भरल्याने त्याचेही दरवाजे उघडण्यात आले आहेत. रेणा नदीलाही पाणी आले. या नदीवरील घनसरगाव, रेणापूर, खरोळा या बराजचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

आतापर्यंत सरासरी ३४८.५ मिलिमीटर पाऊस
जिल्ह्यात दि. १५ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत २.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३४८.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत. लातूर -५.५ (३४५.९) मि.मी., औसा- ०.९ (२३९.२) मि.मी., अहमदपूर- ४.४ (४६७.५) मि.मी., निलंगा – ०.३ (२४४.८) मि.मी, उदगीर- ०.३ (४२८.४) मि.मी, चाकूर-८.० (४१०.१), रेणापूर-१.६ (३३३.९), देवणी- ०.४ (३३०.४), शिरुर अनंतपाळ -२.८ (३९१.८), जळकोट-१.८ (४५६.५), पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३४८.५ मि. मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या