लातूर : जिल्ह्यात रोज नव्या रुग्णांची भर पडत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवार दि़ २९ नोव्हेंबर रोजी एकूण ६१ नवे रुग्ण आढळून आले असून, आज एकाही रुग्णाचा बळी गेला नसल्याने बळींची संख्या ६४५ एवढी झाली आहे.
शनिवारच्या तुलनेत ही संख्या किंचित स्वरुपात कमी झाली असून, या तुलनेत रविवारी ५२ रुग्णांनीच कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३८४ वर गेली असून, रिकव्हरी रेटही पुन्हा घटू लागला असून, आज तो ९५.२७ असा नोंदला गेला. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा चिंता वाढू लागली आहे. जिल्ह्यात आज १९९ आरटीपीसीआर, तर ४५७ रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या.
यात आरटीपीसीआरमधील २०, तर रॅपिड अँटिजनमधील ४१ असे एकूण ६१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१ हजार ७८९ झाली असून, यापैकी २० हजार ७६० रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे सध्या ३८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्ग कासारशिरसीमार्गे जाणार