25.9 C
Latur
Wednesday, October 27, 2021
Homeलातूरपोहरेगाव, निवाडा येथे ६२ जण होम क्वारंटाईन

पोहरेगाव, निवाडा येथे ६२ जण होम क्वारंटाईन

एकमत ऑनलाईन

पोहरेगाव : रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव व निवडा येथे प्रत्येकी एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून भोकरंबा येथे २ रुग्नाची वाढ झाली आहे. तालुक्यातील निवडा व भोकरंबा येथे एक एक रुग्ण सापडले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांची टेस्ट केली रुग्ण आढळून आले आहेत.

संबधित तीन्ही व्यक्तींच्या संपर्कातील लोकांची तपासणी केली असता ही संख्या वाढली नसून या रुग्णांची रवानगी विलिनीगीकरणात करण्यात आली आहे. कोरोना थेट आपल्याच शेजारी आल्याने सर्व नागरिकांमध्ये याबाबत भीतीचे वातावरण तयार झाले. त्यामुळे संपर्कातील व्यक्तीना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे निवासी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.महेश कुलकर्णी यांनी तात्काळ भेट देऊन नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.

रेणापूर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढत असल्याने सर्वानी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.त्यामुळे गावातील व्यक्तींना ताप,सर्दी व खोकला अशी लक्षणे जाणवल्यास घरीच न थांबता तात्काळ रुग्णालयाकडे तपासणीसाठी हजर होणे गरजेचे असल्याचे डॉ.कुलकुर्णी यांनी सांगितले आहे. या रुग्णाचे गुरुवारी तपासणीनंतर स्वॅब पॉझीटीव्ह आले होते. त्यामुळे प्रशासनाकडून आरोग्य विभागातील कर्मचारÞी व आशा अंगणवाडीकडून दिवसभर अधिका-यासमवेत सर्व ग्रामस्थांची खबरदारी म्हणून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

तसेच या कोरोना बाधित व्यक्तींच्या घरातील व व्यक्तीच्या संपर्कातील ६२ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. शिवाय यांच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आल्याने काहीशे दिलासादायक वातावरण दिसून येत आहे. तसेच या कोरोनाबाधित पोहरेगाव, निवाडा व भोकरंबा या तीन्ही व्यक्तीच्या संपर्कातील ९ घरे सील करण्यात आलेली आहेत.

संस्कारक्षम पिढी घडवणारा शिल्पकार!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या