लातूर : जिल्ह्यात रोज नव्या रुग्णांची भर पडत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. शनिवारी एकूण ६४ नवे रुग्ण आढळून आले असून, आज आणखी एकाचा बळी गेला आहे, यामुळे बळींची संख्या ६४५ एवढी झाली आहे. शुक्रवारच्या तुलनेत ही संख्या अधिक प्रमाणात वाढली असून, या तुलनेत कमी म्हणजेच ५६ रुग्णांनीच कोरोनावर मात केली.
त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३७५ वर गेली असून, रिकव्हरी रेटही पुन्हा घटू लागला असून, आज तो ९५. ३० असा नोंदला गेला. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा चिंता वाढू लागली आहे. जिल्ह्यात आज ३३५ आरटीपीसीआर, तर ४३५ रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या. यात आरटीपीसीआरमधील २८, तर रॅपिड अँटिजनमधील ३६ असे एकूण ६४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१ हजार ७२८ झाली असून, यापैकी २० हजार ७०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे सध्या ३७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
माधवराव, राजेशभाई, विलासराव,आर. आर. आबा, पतंगराव, आता अहमदभाई…