21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूरबियाण्यांच्या ८ कंपन्यांचे ६४ नमुने झाले अप्रमाणित

बियाण्यांच्या ८ कंपन्यांचे ६४ नमुने झाले अप्रमाणित

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
खरीप हंगामासाठी कृषि दुकानदारांकडे विविध कंपण्यांचे बियाणे विक्रीसाठी दाखल झाले होते. कृषि विभागाने एप्रिल, मे मध्ये सोयाबीन, मूग, उडीद, तूर, ज्वारी आदी बियाणांचे ३७३ नमुने घेऊन ते परिक्षणासाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यापैकी ८ बियाणे कंपण्यांच्याकडील ६४ लॉटचे नमुणे अप्रमाणीत झाल्याचा अहवाल कृषि विभागाकडे नुकताच प्राप्त झाला आहे. सदर बियाणांची विक्री करू नये, अशा सुचना कृषि विभागाने दुकानदारांना दिल्या आहेत.

लातूर जिल्हयात ६ लाख १२ हजार ४२१ हेक्टरवर खरीपाची पेरणी होत आहे. त्यासाठी कृषि विभागाच्यावतीने बि-बियाणे, खते व किटकनाशके यांचा पुरवठा जिल्हयात कशा पध्दतीने होईल याचे नियोजन केले होते. जिल्हयात बि-बियाणांचे १ हजार ४० दुकाने, रासायनीक खतांचे ९४०, तर किटकनाशकाचे ७९६ दुकाने आहेत. शेतक-यांना दर्जेदार बियाणे पेरणीसाठी उपलब्ध व्हावे, यासाठी कृषि विभागाला सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी बियाणांचे ३४८ नमुने तपासणीसाठी उद्द्ष्टि देण्यात आले होते. मात्र कृषी विभागाने एप्रिल, मे मध्ये विविध बियाणांचे ३७३ नमुने घेवून परभणी येथील बिज परिक्षण प्रयोगशाळेकडे पाठवले होते.

सदर बिज परिक्षणाचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आसून ८ कंपण्यांचे ६४ लॉटचे नमुणे अप्रमाणीत आले आहेत. यात ८० टक्के बियाणे हे सोयाबीनचे आहे. ८ कंपण्यांच्या २७ लॉटच्या नमुण्या संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. तर ३७ लॉटच्या नमुण्यांच्या बाबतीत कोर्टात गुन्हे दाखल होण्यासाठी पात्र आहेत. या सदर्भाने २५ कृषि दुकानांना अप्रमाणीत बियाणे विक्री न करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच तीन कृषि दुकानावर कारवाईही झाली आहे.

रासायनीक खताचे १५ नमुने अप्रमाणित
कृषि विभागाने दोन महिण्यापूर्वी खत कंपण्याचे १७८ नमुणे घेऊन ते किटकनाशक प्रयोगशाळा, पुणे येथे पाठण्यात आले होते. सदर प्रयोग शाळेचा नुकताच अहवाल आला आहे. यात ७ कंपण्यांच्या खताचे १५ नमुण्यात ठरवूण दिलेले घटक कमी प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले आहे. ३ अप्रमाणित नमुण्याच्या संदर्भात कंपण्यांना नोटीस देवून ताकीद दिली आहे. तर १२ खत नुमण्याच्या संदर्भाने कंपण्यावर कोर्ट केस होणार असल्याची माहिती लातूर जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाचे मोहिम अधिकारी गोपाळ शेरखाने यांनी दिली.

किटक नाशकाच्या अहवालाची प्रतिक्षा
जिल्हयात किटकनाशकांचे ७९६ दुकाने आहेत. कृषि विभागाने एप्रिल, मे मध्ये या दुकानातून किटकनाशकांचे ६१ नमुणे घेवून ते विश्लेषण प्रयोगशाळा, पुणे येथे तपासणीसाठी पाठवले आहेत. सदर अहवाल या आठवडयात येण्याची शक्यता असल्याचे जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालयातील गुणनियंत्रण निरिक्षक व्ही. के. मिस्कीन यांनी सांगीतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या