25.7 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeलातूरमोरवड शिवारात अफूची ६८० झाडे जप्त

मोरवड शिवारात अफूची ६८० झाडे जप्त

एकमत ऑनलाईन

रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यातील मोरवड शिवारात एका शेतक-यांने शेतात अवैधरित्या लागवड केलेल्या अफूच्या शेतीवर रेणापूर पोलीसांनी धाड टाकुन १ लाख ४८ हजार रूपयांची ६८० झाडे जप्त केल्याची घटना शुक्रवार दि. १० फेब्रुवारी रोजी सांयकाळी घडली. या प्रकरणी संबंधीत शेतक-यावर रेणापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रेणापूर तालुक्यातील मोरवड शिवरात विठ्ठल बाबासाहेब क्षिरसागर रा. मोरवड या शेतक-यांने आपल्या शेतात अफूच्या झाडांची लागवड केल्याची माहिती रेणापूर पोलीसांना मिळाली. याची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक सोमया मुंडे व सहायक पोलीस अधिक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपक शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कन्हेरे, गौतम घाडगे, बालाजी डफडवाड, किरण गंभिरे, बालाजी जोडपे, बिट अंमलदार एफ.सी. मुंडे, सूर्यवंशी या पथकांने मोरवड शिवरात जावुन विठ्ठल बाबासाहेब क्षिरसागर यांच्या मोरवड शिवारातील गट नंबर २१३ मध्ये असलेल्या शेतात धाड टाकली असता कांद्यााच्या लागवडीबरोबर अंतर पिक म्हणून प्रतिबंधित असलेली अफूची हिरवी एक फुट ते अडीच फूट पर्यंत वाढलेली लहान मोठी झाडे ज्याचे पाने बोंड व पांढरे फुले असलेली ६८० झाडे आढळून आली. पोलीसांनी सदर झाडाची कापणी करून वजन केले असता २१ किलो २०० ग्रॅम झाले. याचा प्रति किलो ७ हजार रुपये भाव असुन या शेतात १ लाख ४८ हजार ४०० रुपयांचा अफूच्या झाडांची लागवड केल्याचे आढळून आले.

कृषि अधिकारी रामकिसन बानापुरे यांना घटना स्थळी बोलावुन पंचनामा करून अफूची ६८० झाडे पोलासांनी जप्त केली. दरम्यान या प्रकरणी पोलीस निरीक्षक दीपक शिंदे यांच्या फिर्यादीवरून शेतकरी विठ्ठल बाबासाहेब क्षिरसागर यांच्या विरुध्द शेतात अवैद्यरित्या अफूच्या झाडाची लागवड करून ती झाडे उत्पादन काढण्याच्या उद्देशाने जोपासली म्हणून गुरनं४३ / २३ , १८ ( ब ) गुंगीकारक औषधी द्राव्य आणि मनोध्यापरावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भंडे व पोलीस कर्मचारी किरण गंभिरे हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या