22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यातील ६८ हजार नागरिकांनी हरवले कोरोनाला

लातूर जिल्ह्यातील ६८ हजार नागरिकांनी हरवले कोरोनाला

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यातील ६८ हजार ४६९ रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. दि. ९ मे रोजी नवीन ९५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे. लातूर जिल्ह्यात रुग्ण बरे होणा-याचे प्रमाण ८४.५३ टक्के असल्यामुळे समाधाव व्यक्त केले जात आहे.

लातूर जिल्ह्यात १५५७ आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने घेण्यात आलेलेआहेत. २६१ अहवाल प्रलंबित आहेत. ३२८ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या प्रलंबितमधील १०० पॉझिटिव्ह आले आहेत. २२६२ रॅपीड ऍन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये ५२९ जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८० हजार ९९२ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १० हजार ९६८ आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत १५५५ रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६८ हजार ४६९ आहे. रविवारी बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०८१ आहे.

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनासंबंधी चाचण्याही आरोग्य विभागाने वाढविल्या आहेत. दि. ९ मे पर्यंत जिल्ह्यात ४ लाख ७२ हजार ७५ जणांच्या चाणण्या झालेल्या आहेत. यात १ लाख ७९ हजार ६१६ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या झाल्या आहेत. यात ३१ हजार १८७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. २ लाख ९२ हजार ४५९ जणांच्या अँटीजेन चाचण्या झाल्या आहेत. त्यात ४९ हजार ८०५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८० जार ९९२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यात गंभीर रुग्णांची संख्या कमी होत आहे. सध्या अ‍ॅक्टिव्ह १० हजार ९६८ रुग्ण आहेत. त्यापैकी ८ हजार १८ रुग्ण हे अत्यंत सौम्य लक्षणे असलेली आहेत. गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. रुग्ण मोठ्या संख्येने बरे होऊन घरी जात आहेत. सध्या परिस्थितीत
आणखी आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या उपाय योजनांची कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

कोरोना बाधित उपचार घेत असलेल्या रुग्णांची रविवारची संख्या
↪ उपचार घेत असलेले रुग्ण- १०९६८
↪ आयसीयुमध्ये असलेले रुग्ण- ९७२
↪ गंभीर मेकॅनिकल व्हेंटीलेटरवरील रुग्ण- ६६
↪ गंभीर बायपॅप व्हेंटीलेटरवरील रुग्ण- ४२०
↪ मध्यम (ऑक्सिजनवर) असलेले रुग्ण- १८६१
↪ मध्यम परंतू ऑक्सिजनवर नसलेले रुग्ण- ५४०
↪ सौम्य लक्षणे असलेले रुग्ण- ८०८१

आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या