21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूर१२ मोटारसायकलीसह ७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

१२ मोटारसायकलीसह ७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
वरिष्ठ पोलिस अधिका-यांचे मार्गदर्शन व पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांचे नेतृत्वात उदगीर ग्रामीण पोलीस अधिकारी व आमदार यांच्या विशेष पथकाने चोरीच्या १२ मोटारसायकलसह ७ लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर पथक उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडलेल्या गुन्ह्यामधील मोटारसायकल चोरीतील संशयित आरोपी महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगत असलेल्या गावात, परिसरात चोरीच्या मोटरसायकल अतिशय कमी किंमतीत विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.

त्याची शहनिशा व विश्लेषण करून सदर पथक कर्नाटक सीमेलगत असलेल्या भागात माहिती मधील आरोपीच्या शोध घेतला असता मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित नेताजी नारायण घोडके (३९ रा. गुंडोपंत दापका ता. मुखेड जि. नांदेड) यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून मोटारसायकल चोरी करून सीमालगतच्या भागातील गावात कमी किमतीत विकल्याचे सांगितले. त्यावरून अधिक तपास करून पथकाने १२ मोटरसायकली जप्त केल्या आहेत. या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपीकडून आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक सुमेध बनसोडे हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या