22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरउदगीर ग्रामीण हद्दीत चोरीच्या ७ दुचाकी केल्या जप्त

उदगीर ग्रामीण हद्दीत चोरीच्या ७ दुचाकी केल्या जप्त

एकमत ऑनलाईन

उदगीर : गामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी आरोपींसह चोरीच्या सात दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. त्यांची एकूण किंमत ७८ हजार रुपये इतकी आहे. उदगीर ग्रामीण हद्दीत व परिसरातील चोरीस गेलेल्या दुचाकींबाबत मिळालेल्या माहितीवरुन कार्यवाही करीत आरोपी नामे फारुख रौफ पठाण (रा. जम्मनगर बिदर गेट जवळ) व शुभम दत्ता तेलंगे वय १८ वर्षे रा. निडेबन (ता. उदगीर) यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली प्रथम: त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पोलीसांचा संशय अधिक बळावला त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता एकूण ७ चोरीस गेलेल्या दुचाकी अंदाजे किंमत ३, ७८,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन ताब्यात घेतले. नमुद आरोपी हे सध्या पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे ठाण्याच्या ताब्यात आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी बेन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या पथकांतील पोलिस कॉन्स्टेबल राम बनसोडे, राहूल नागरगोजे, तुळशीराम बरुरे, राहूल गायकवाड, सचीन नाडागुडे यांनी परिश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या