24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरजळकोट तालुक्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस

जळकोट तालुक्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस

एकमत ऑनलाईन

जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्याला जुलै महिन्यामध्ये मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपून काढलेले आहे. अनेक वर्षानंतर प्रथमच जुलै महिन्यामध्ये सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला आहे. सलग पडलेल्या पावसामुळे अनेक शेतातील पिके पाण्याखाली गेली होती. तसेच तालुक्यातील अनेक साठवण तलाव भरून ओसंडून वाहत आहेत. जळकोट तालुक्यातील अनेक साठवण तलावही परतीच्या पावसावर भरत असतात. तालुक्यामध्ये पोळ्यापर्यंत अतिशय अल्पसा पाऊस पडतो. यानंतर पावसाचा जोर वाढतो परंतु यावर्षी मात्र जळकोट तालुक्यामध्ये जुलै महिन्यामध्ये खूप पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतीमध्ये पाणीच पाणी झाले आहे.

गत आठवड्यामध्ये सलग तीन ते चार दिवस पाऊस पडला , या पावसामुळे शेतामधूनच स्वच्छ पाणी वाहत होते. नदी नाले ओसंडून वाहू लागले. शेतीमध्ये कोणतीही कामे झाले नाहीत . शेतामध्ये मोठ्या प्रमाणात त्रण वाढले, अशा परिस्थितीत शेतकरी हा पाऊस उघडावा अशी अपेक्षा करत होता. यानंतर शुक्रवारी आणि शनिवारी हे दोन दिवस पाऊस पडला नाही. यानंतर मात्र रविवारी मध्यरात्री तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला. दोन तासांमध्येच ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली . या झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा शेतामध्ये पाणीच पाणी करून टाकले.

जळकोट तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ही ८०० मिलिटरी एवढी आहे, आज घडीला जुलै महिन्याच्या तिस-या आठवड्याामध्ये तालुक्यात ५५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे .प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस जुलै महिन्यात झाला आहे. सरासरीच्या जळकोट तालुक्यामध्ये ७० टक्के एवढा पाऊस झाला आहे. जळकोटा डोंगरी तालुका आहे कधीकधी सरासरीच्या ५० टक्के देखील पाऊस पडत नाही. यावर्षी मात्र जुलै महिन्यामध्ये ७० टक्के एवढा पाऊस झाला आहे.

या झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी मात्र संकटात सापडला आहे. अति पावसामुळे ज्या शेतीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अतिशय कमी आहे अशी शेती आता पूर्णत: वाया जाण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी आता पिक विमा भरत आहेत. येणा-या काळात असाच पाऊस पडत राहिला तर शेतक-यांच्या हाती मात्र काहीच लागणार नाही अशी शक्यता वर्तिवण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या