20.8 C
Latur
Saturday, October 31, 2020
Home मराठवाडा ७०:३० चा कोटा रद्द; अमित देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

७०:३० चा कोटा रद्द; अमित देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

एकमत ऑनलाईन

महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेशासाठीचा ७०:३० हा कोटा रद्द करण्याचा निर्णय दि. ८ सप्टेंबर रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत घेतला. या निर्णयाने गेली ३६ वर्षे मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थ्यांवरील
होणार अन्याय दुर होणार आहे. या निर्णयाबद्दल महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. असंख्य मान्यवरांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे अभिनंदन केले आहे.

राज्यात ४५ वर्षांपूर्वी तत्कालीन प्रादेशिक स्तरावरील शैक्षणिक परिस्थिती विचारात घेत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ७०:३० कोटा पद्धत अमलात आली. मागील काही वर्षांत प्रादेशिकतत्वावर झत्तलेले बदल, अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी वाढलेली प्रचंड स्पर्धा विचारात घेऊन कोटा पद्धत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठीच अन्यायकारक ठरु लागली. त्यामुळे ही पद्धत रद्द करुन राज्य पातळीवर समान पद्धतीने प्रवेश आहे. त्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शविली होती. मराठवाड्यातील आमदारांनीही याबाबत आवाज उठवला होता. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी ७०:३० चा कोटा रद्द करणारा महत्वपूर्ण निर्णय विधानसभेत घेतला.

  • वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या कोटा पद्धतीनूसार संबंधित विभागातील ७० टक्के जागा त्याच विभागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आणि उर्वरीत ३० टक्के जागांवर अन्य विभागातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. आता असे होणार नाही.
  • मराठवाड्यात केवळ ६ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यात ९०० जागा आहेत. ७० टक्क्यांच्या हिशेबाने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या वाट्याला ३६० जागा येतात.
  • विदर्भातील ९ महाविद्यालयांत १४५० जागा आहेत. त्यापैकी विदर्भातील विद्यार्थ्यांना १०१५ जागा मिळता.
  • उर्वरित महाराष्ट्रातील २६ महाविद्यालयात ३९५० जागा आहेत. त्यापैकी २७६५ जागांवर तेथील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.
  • विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रातील केवळ ३० टक्के जागांसाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा करवी लागते. विशेष म्हणजे, संबंधीत विभागातील विद्यार्थीही या ३० टक्के जागांवरील प्रवेशाच्या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.
  • राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ६३०० जागा आहेत. त्यापैकी केवळ १४.२८ टक्के जागा मराठवाड्यात आहेत.
  • मराठवाड्यात वैद्यकीय महाविद्यालये आणि उपलब्ध जागा अन्य विभागाच्या तुलनेत कमी आहेत. परिणामी विभागातील विद्यार्थ्यांसाठी तूलनेत कमी जागा उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे.

अमित देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

मराठवाड्यातील तरुणांच्या पंखांना आता नवे बळ मिळेल-आमदार धिरज देशमुख
लातूरसह मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा वैद्यकीय प्रवेशासाठीचा ७०:३० हा फॉर्म्युला (कोटा) रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. वैद्यकीय प्रवेशातील प्रादेशिक असमतोल दूर करणारा, असंख्य विद्यार्थी-पालकांना दिलासा देणारा हा ऐतिहासिक, असा निर्णय आहे. यामुळे मराठवाड्यातील तरुणांच्या पंखांना आता नवे बळ मिळेल, अशा भावना लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी मंगळवारी व्यक्त केल्या.

वैद्यकीय प्रवेशासाठीचा ७०:३० हा फॉर्म्युला रद्द करण्यात यावा, असे पत्र वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे आमदार धिरज देशमुख यांनी २१ ऑगस्ट रोजी दिले होते. त्यानंतर आमदार धिरज देशमुख यांच्यासह मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी भेट घेऊन त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडला. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी राज्यातील ७०:३० हा फॉर्म्युला रद्द केल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दि. ८ सप्टेंबर रोजी विधानसभेत केली.

या पार्श्वभूमीवर, आमदार धिरज देशमुख यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आणि महाविकास आघाडीचे आभार मानले. शिवाय, ७०:३० हा फॉर्म्युला रद्द करुन ‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’द्वारे प्रवेश करण्याच्या निर्णयाचेही त्यांनी स्वागत केले. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत ७०:३० हा फॉर्म्युला रद्द करण्याची घोषणा करुन मराठवाड्यातील विद्यार्थी-पालकांना त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आता नवी उभारी मिळेल, अशा भावनाही आमदार धिरज देशमुख यांनी व्यक्त केल्या.

आमदार धिरज देशमुख म्हणाले, १९८४ पूर्वी वैद्यकिय प्रवेश संबधीत विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयापूरते मर्यादीत होते. १९८४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार संबधीत विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये ७० टक्के व विद्यापीठाच्या बाहेरील क्षेत्रासाठी ३० टक्के याप्रमाणे प्रवेश होते. १९९९ मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना झाल्यावर सर्व वैद्यकिय महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न झाले. परंतु ७०:३० चा प्रवेशाचा हा नियम भौगोलिक क्षेत्राशी निगडीत करुन कोणत्याही अधिसूचनेशिवाय स्वत:हुन लागू केला व तो आजपर्यंत तसाच सुरु आहे.

वास्तविक, विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर व सामायिक परिक्षा घेतल्यानंतर एकच गुणवत्ता यादी असायला हवी होती व त्यानुसारच प्रवेश देणे आवश्यक होते. पण, ते झाले नाही. मात्र ७०:३० हा फॉर्म्युला आता रद्द झाल्यामुळे मराठवाड्यातील आणि विदर्भातील असंख्य विद्यार्थी-पालकांना दिलासा मिळाला आहे.

प्रादेशिक असमतोल दूर करणारा निर्णय-डॉ. गोपाळराव पाटील
वैद्यकीय प्रवेशासाठीचा ७०:३० चा कोटा रद्द करणारा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. हा निर्णय प्रादेशिक असमतोल दुर करणारा निर्णय आहे. खरे तर ७०:३० मुळे मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना आजपर्यंत खुप अन्याय झाला आहे. आता तो अन्याय होणार नाही. मराठवाड्याची गुणवत्ता ही बावन्नकश्ी आहेच आता ती पुन्हा एकदा झळाळून निघेल, असे लातूर येथील शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील यांनी ‘एकमत’शी बोलताना सांगीतले.

अभिनंदन! आता कॅव्हेट दाखल करा-अनिरुद्ध जाधव  
७०:३० हा प्रलंबीत प्रश्न राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी पुढाकार घेऊन सोडवला. त्याबद्दल त्यांचे खुप अभिनंदन. त्याबरोबरच मराठवाड्यातील आमदार, खासदार यांनी संघटीत प्रयत्न केले. त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो. मराठवाड्यातील मुलांना परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळूनही त्यांना त्यांच्या पसंतीनूसार पुणे-मुंबईच्या मेडीकल कॉलेजला प्रवेश मिळू शकत नव्हता.

भारतीय संविधानानूसार श्क्षिणाची संधी व गुणवत्ता या चे समान वाटप झाले पाहीजे, हे अभिप्रेत आहे. या दोन्हीचा विचार करुन आतापर्यंत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर आतापर्यंत अन्याय झालेला आहे. तो आता दुर झाला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करुन एक विनंती करावीशी वाटते की उच्च न्यायालयात या संबंधी कॅ व्हेट दाखल करणे आवश्यक आहे.

आता इंजिनिअरींगसाठीही निर्णय घ्या-डॉ. पी. के. शहा
वैद्यकीय प्रवेशातील ७०:३० चा कोटा रद्द करणारा निर्णय राज्य सरकारचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
यांनी घेतला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. खरे तर व्यवसायीक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ७०:३० किंवा असा कोठलाही कोटा नसच मात्र गेल्या ४५ वर्षांत महाराष्ट्रात वैद्यकीय प्रवेशासाठी असा कोटा होता. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत राहिला.  आता या निर्णयाने वैद्यकीय शिक्षण घेणा-या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवरील अन्याय दुर होणार असून आता इंजिनिअरींगच्या प्रवेशासाठीचाही निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा येथील डॉ. पी. के. शहा यांनी व्यक्त केली.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे आकाश मोकळे झाले-डॉ. अमीर शेख
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यात असलेली आरक्षणाची ७०:३० कोटा पद्धत अन्यायककारच होती. चांगले गुण मिळवूनही मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना विभागीय कोटा पद्धतीमुळे संधी मिळत नव्हती. ३० टक्के कोट्यातच संपूर्ण मराठवाडा सहभागी केला जात असल्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना अत्यंत कमी संधी मिळत होती. आता महाराष्ट्र सरकारमधील वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ७०:३० चा कोटाच रद्द करणारा निर्णय विधानसभेत घेतल्याने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे आकाशच मोकळे झाले आहे, असे येथील डॉ. अमीर शेख यांनी म्हटले.

प्रादेशीक आरक्षण रद्द झाल्याने गुणवत्तेला न्याय-प्रा. दासराव सुर्यवंशी 
राज्यात मराठवाडा, विदर्भ, उर्वरित महाराष्ट्र असे तिन विभाग करण्यात आले होते. त्यात मराठवाडा व विदर्भात १४ महाविद्यालय असुन २ हजार ३०० जागा आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात २६ कॉलेज व ३ हजार ५० जागा आहेत. त्यामूळे मराठवाडा विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय व्हायचा. आता या आजच्या ७०:३० आरक्षण रद्द केल्याने गुणवंत विद्यार्थ्याना न्याय मिळाला आहे. याबाबत राज्य सरकार व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे दयानंद विज्ञान महाविद्यालयातील प्रशासकीय अधिक्षक प्रा. दासराव सुर्यवंशी यांनी आभार व्यक्त केले.

वैद्यकीय प्रवेशाचा जाचक निर्णयरद्द झाल्याने विद्यार्थ्याना न्याय मिळणार-रमेश बियानी
महाराष्ट्र सरकारने वैद्यकीय प्रवेशासाठी ७०:३० हा जाचक अटीचा कायदा आज विधी मंडळाच्या अधिवेशनात सरकारने रद्द केल्याने मराठवाडयातील गुणवंत विद्यार्थ्याना राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात आता गुणवत्तेनुसार प्रवेश मिळनार आहे. याबद्दल राज्य सरकार, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियानी यांनी आभार मानले.

अत्यंत चांगला निर्णय-मकरंद सावे
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, या गुणवत्तेला ७०:३० मुळे अडथळा निर्माण झाला होता. गुणवत्ता असूनही महाराष्ट्रातील उत्तम मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश घेता येत नव्हता किंबहूना तो मिळतही नव्हता. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्य मंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी ७०:३० चा कोटा रद्द करणारा निर्णय घेता हा निर्णय अत्यंत चांगला, असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे म्हटले आहे.

ऐतिहासिक निर्णय भावी पिढया विसरणार नाहीत-डी. एन. केंद्रे 
मराठवाडयाचे भूमिपुत्र वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी ७०:३० चे वैद्यकीय प्रवेशासाठीचे जाचक धोरण रद्द केल्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. वैद्यकीय प्रवेशातील मराठवायाच्या गुणवत्तेचे होणारे खच्चीकरण रोखले. तुमच्या व राज्य शासनाचा एैतिहासीक निर्णय आमच्या भावी पिढया कदापी विसरू शकणार नाहीत, अशी प्रतिक्रीया राजमाता जिजामाता शैक्षणीक संकूलाचे प्रमुख तथा मराठवाडा पालक संघाचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी दिली.

अनेक वर्षांच्या संघर्षाचे फलित-अ‍ॅड. उदय गवारे
वैद्यकीय अभ्याक्रमाला प्रवेश घेणा-या मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठा अन्याय सहन केला आहे. ७०:३० चा कोटा रद्द व्हावा, हा अन्याय दुर व्हावा, यासाठी अनेक वर्षांपासून विविध संघटना विशेषत: विद्यार्थी-पालक मंच लातूरच्या वतीने धरणे, निवेदने, मोर्चे अशी आंदोलने करण्यात आली. राज्य सरकाचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मराठवाड्यातील सर्व घटकांतील विद्यार्थ्यांचा विचार करुन ७०:३० चा कोटा रद्द करणारा अत्यंत चांगला निर्णय घेतला., असे अ‍ॅड. उदय गवारे म्हणाले.

संघर्षशील लातूरकरांचे अभिनंदनडॉ. सिद्राम डोंगरगे
वैद्यकीय प्रवेशासाठी जात व प्रवर्ग निहाय आरक्षण असतानाही पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची ७०:३० कोटा पद्धत रद्द करण्यासाठी संघर्ष करणा-या लातूरकरांचे कार्य अभिनंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, या कार्यासाठी लातूर शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी व शैक्षणिक संस्थांनी दि. ४ सप्टेंबर रोजी निवेदन दिले होते व त्याची दि. ८ सप्टेंबर रोजी अंमलबजावणी झाली. या अंमलबजावणीमुळे आरोग्यविज्ञान अभ्यासक्रमाचा ७०:३० चा पॅटर्न रद्द करण्यात आला. त्या बद्दल महाराष्ट्र शासनाचे व तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे हार्दिक अभिनंदन. ख-या अर्थाने विदर्भ व मराठवाड्यातील मेरिटच्या विद्यार्थ्यांवर एक प्रकारे अन्यायच होत होता, तो या निर्णयाने दूर झाला.

कुलस्वामिनी विद्यालयाकडून फिसबाबत मनमानी कारभार

ताज्या बातम्या

राज्यात १५ लाखांवर रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणा-या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा रुग्णांची एकूण संख्या १५ लाखांच्यावर गेली आहे. राज्यासाठी ही दिलासा देणारी...

कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा रद्द!

भोपाळ : मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, कॉंग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रचारादरम्यान, भाजपच्या महिला उमेदवारांचा आयटम असा उल्लेख केला...

लातूर जिल्ह्यात ५५ नवे रुग्ण

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटत चालली असून, शुक्रवार दि़ ३० ऑक्टोबर रोजी ५५ नवे रुग्ण आढळून आले़, तर आज ४ बाधितांचा बळी गेल्याने...

एक हत्या लपविण्यासाठी केल्या ९ हत्या

हैदराबाद : तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील मे महिन्यात ९ जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली बिहारमधील एका तरुणाला बुधवारी कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. गुन्हेगार संजय कुमार...

झाकीर नाईकने दिला फ्रान्सला इशारा

क्वालांलपूर : मागील काही दिवसांपासून इस्लामिक राष्ट्रांमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि फ्रान्स सरकारविरुद्ध निर्दर्शने केली जात आहेत. इस्लाम धर्माबद्दल मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे...

बिहारमधील ४१५ उमेदवार कोट्यधीश

पाटणा : सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. गुरूवारी बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यादरम्यान, एक महत्त्वाची बाब समोर...

आधार पडताळणीनंतरच निधी मिळणार – वार्षिक ६००० रुपये किसान सन्मान निधी योजना

नवी दिल्ली : जर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वार्षिक ६००० रुपये घ्यायचे असतील तर आधार व्हेरीफिकेशनसाठी तयार राहा. देशातील काही राज्यांमध्ये...

भारतीय लष्कराने आणले नवे साई चॅट अ‍ॅप

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने व्हॉट्स ऍपप्रमाणेच एक नवे ऍप विकसित केले असून, लष्कराने विकसित केलेल्या या ऍपला सिक्युअर ऍप्लिकेशन...

प्रवासी गाड्या एक्सप्रेसमध्ये रुपांतरीत होणार

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आता आपल्या कोट्यवधी प्रवाशांना नवीन भेट देण्याची तयारी करत आहे, त्यानंतर लांबचा प्रवास हा अवघ्या काही तासांचा असेल. वास्तविक...

रशियन पोलिसांवर मुस्लिम तरुणाचा हल्ला

मॉस्को : रशियाचील मुस्लिमबहुल भागात आज एकाने ‘अल्ला हो अकबर’ म्हणत एका पोलिसावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसाने हल्लेखोराला गोळ्या घातल्या. या घटनेमुळे...

आणखीन बातम्या

राज्यात १५ लाखांवर रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणा-या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा रुग्णांची एकूण संख्या १५ लाखांच्यावर गेली आहे. राज्यासाठी ही दिलासा देणारी...

कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा रद्द!

भोपाळ : मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, कॉंग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रचारादरम्यान, भाजपच्या महिला उमेदवारांचा आयटम असा उल्लेख केला...

लातूर जिल्ह्यात ५५ नवे रुग्ण

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटत चालली असून, शुक्रवार दि़ ३० ऑक्टोबर रोजी ५५ नवे रुग्ण आढळून आले़, तर आज ४ बाधितांचा बळी गेल्याने...

एक हत्या लपविण्यासाठी केल्या ९ हत्या

हैदराबाद : तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील मे महिन्यात ९ जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली बिहारमधील एका तरुणाला बुधवारी कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. गुन्हेगार संजय कुमार...

झाकीर नाईकने दिला फ्रान्सला इशारा

क्वालांलपूर : मागील काही दिवसांपासून इस्लामिक राष्ट्रांमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि फ्रान्स सरकारविरुद्ध निर्दर्शने केली जात आहेत. इस्लाम धर्माबद्दल मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे...

बिहारमधील ४१५ उमेदवार कोट्यधीश

पाटणा : सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. गुरूवारी बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यादरम्यान, एक महत्त्वाची बाब समोर...

आधार पडताळणीनंतरच निधी मिळणार – वार्षिक ६००० रुपये किसान सन्मान निधी योजना

नवी दिल्ली : जर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वार्षिक ६००० रुपये घ्यायचे असतील तर आधार व्हेरीफिकेशनसाठी तयार राहा. देशातील काही राज्यांमध्ये...

भारतीय लष्कराने आणले नवे साई चॅट अ‍ॅप

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने व्हॉट्स ऍपप्रमाणेच एक नवे ऍप विकसित केले असून, लष्कराने विकसित केलेल्या या ऍपला सिक्युअर ऍप्लिकेशन...

प्रवासी गाड्या एक्सप्रेसमध्ये रुपांतरीत होणार

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आता आपल्या कोट्यवधी प्रवाशांना नवीन भेट देण्याची तयारी करत आहे, त्यानंतर लांबचा प्रवास हा अवघ्या काही तासांचा असेल. वास्तविक...

रशियन पोलिसांवर मुस्लिम तरुणाचा हल्ला

मॉस्को : रशियाचील मुस्लिमबहुल भागात आज एकाने ‘अल्ला हो अकबर’ म्हणत एका पोलिसावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसाने हल्लेखोराला गोळ्या घातल्या. या घटनेमुळे...
1,325FansLike
120FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...