33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home लातूर ७,२८६ उमेदवारांचा उद्या फैसला

७,२८६ उमेदवारांचा उद्या फैसला

एकमत ऑनलाईन

लातूर : गावकारभारी निवडीसाठी शुक्रवार दि. १५ जानेवारी रोजी लातूर जिल्ह्यात ७८.८२ टक्के मतदान झाले. त्यामुळे ३८३ ग्रामपंचायतींच्या ७ हजार २८६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले होते. आज दि.. १८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी होणार असून नव्या गावकारभा-यांचा आज फैसला होणार आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यांच्या ठिकाणी तालुकास्तरावर मतमोजणी होणाार आहे.

लातूर जिल्ह्यातील ३८३ ग्रामपंचायतींसाठी दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत १ हजार ४३२ मतदान केंद्रांवर मतदान झाले. सांयकाळी ५.३० वाजता सरासरी ७८.८२ टक्के मतदान झाले आहे. ग्रामीण भागाच्या विकाससाठी निगडीत ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शांततापूर्ण वातावरणात उत्साही मतदान झाले होते. भारत निवडणुक आयोगाने लातूर जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम झाली केला होता. या निवडणुकीसाठी इच्छूकांनी मोठ्या प्रमाणात नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. एकीकडे निवडणुकीची तयारी तर दुसरीकडे बिनविरोध ग्रामपंचायत काढण्याच्या हालचाली झाल्याने जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या. त्यामुळे जिल्ह्यातील ३८३ ग्रामपंचायतींसाठी दि. १५ जानेवारी रोजी मतदान झाले.

लातूर तालुक्यात ७६.५५ टक्के, औसा ७९.३९ टक्के, रेणापूर ८३.५२, उदगीर ८०.७४, अहमदपूर ७९.०६, जळकोट ८०.७२, निलंगा ७७.४४, देवणी ७८.५० तर शिरुर अनंतपाळ तालुक्यात ७९.३४ टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यातील वलांडी, धनेगाव, जवळगा, विळेगाव, नेकनाळ, कवठाळा, इंद्राळ, हंचनाळ, उदगीर, वाढवणा बु., निडेबन, किनी यल्लादेवी, कुमठा, दावणगाव, नळगीर, बेलसक्करगा, येणकी, लोहारा, हंडरगूळी या संवेदनशील गावांसह जिल्हाभरात शांतापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. क्वॉरंटाईन असलेल्या मतदारांना शेवटच्या तासात वेळ राखीव ठेवण्यात आला होता.

ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या