22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरजिल्ह्यातील १४२ प्रकल्पांत ७३.६९ टक्के उपयुक्त पाणी

जिल्ह्यातील १४२ प्रकल्पांत ७३.६९ टक्के उपयुक्त पाणी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील मांजरा, निम्न तेरणा या दोन मोठ्या प्रकल्पांसह ८ मध्यम, १२८ लघू व ४ समन्वय लघू प्रकल्प असे एकुण १४२ प्रकल्पांमध्ये ७३.६९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. लातूर शहराच्या पिण्याच्या पाणयासाठी महत्वपुर्ण असलेल्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात ४२.९० टक्के, निम्न तेरणा प्रकल्पात ९३.८९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. ८ मध्यम प्रकल्पांत ८३.७५ टक्के तर १२८ लघू प्रकल्पांत ८१.३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत जिल्ह्यात ब-यापैकी पाऊस झाला आहे. जुन महिन्यात म्हणावासा पाऊस झाला नसला तरी जुलै महिन्यात ब-यापैकी पाऊस झाला. या महिन्यात कधी तूरळक, कधी मध्यम, कधी जोरदार, कधी संततधार तर कधी अतिवृष्टीही झाली.

या पावसामुळेच जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढला. संततधार आणि अतिृष्टीने हजारो हेक्टर शेतजमीनीत पाणी साचले. खरीपाच्या पिकांत पाणी साचल्यामुळे बहुतांश ठिकाणी खरीपाची पिके अनेक दिवस पाण्यातच होती. त्यामुळे ही पिके पिवळी पडली. त्यातच पिकांवर गोगलायीचे आक्रमण झाले. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नूकसान झाले. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत नोंद घ्यावी, असा पाऊसच पडला नाही. आभाळ येतोे, पावसाचे वातावरण तयार होते आणि भूरभूर पावसानंतर पाऊस थांबतो आहे. गेल्या १५-२० दिवसांत पाऊसच नसल्याने पिकांना पावसाची गरज आहे. काळ्या जमिनीवरील पिके तग धरुन आहेत तर हलक्या जमिनीवरील पिकांना पाऊस गरजेचा आहे. लातूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ८०२.१३ एवढी आहे. यंदा आजपर्यंत ५४९.८१ टक्के पाऊस पडला असून त्याची टक्केवारी ६८.५४ इतकी आहे.

लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पाचा प्रकल्पीय पाणीसाठा २२४.०९३ दशलक्षघनमीटर आहे. सध्या या प्रकल्पात १२३.०४६ दशलक्षघनमीटर पाणीसाठा म्हणजेच ४२.९० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. निम्न तेरणा प्रकल्पाचा प्रकल्पीय पाणीसाठा १२१.१८८ दशलक्षघनमीटर एवढा आहे. सध्या या प्रकल्पात ११५.६१४ दशलक्षघनमीटर म्हणजेच ९३.८९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. या दोन्ही मोठ्या प्रकल्पांत ६०.२४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरु, देवर्जन साकोळ, घरणी व मसलगा या आठ मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय पाणीसाठा १४७.१०१ दशलक्षघनमीटर एवढा आहे. या आठही प्रकल्पांत एकुण उपयुक्त पाणीसाठा १०२.३०२४ दशलक्षघनमीटर म्हणजेच ८३.७५ टक्के आहे. १२८ लघू प्रकल्पांचा प्रकल्पीय पाणीसाठा ४७८.९६२ दशलक्षघनमीठर आहे तर सध्या या प्रकल्पांमध्ये ३४३.६२५ दशलक्षघनमीटर म्हणजेच ८२.०२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील एकुण १४२ प्रकल्पांचा प्रकल्पीय पाणीसाठा ८३३.५०६ दशलक्षघनमीटर असून सध्या या प्रकल्पांममध्ये ५१२.४८३ दशलक्षघनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ७३.६९ एवढी आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या