23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूर७५ विजेत्यांनी पटकावले प्रत्येकी एक हजार रुपये

७५ विजेत्यांनी पटकावले प्रत्येकी एक हजार रुपये

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
‘स्­वातंत्र्याचा अमृतमहोत्­सव’ अंतर्गत शहरातील कोविड-१९ आजारापासून संरक्षण प्राप्­त व्­हावे यासाठी व लसीकरणाचे विशेषत: प्रिकॉशन डोसचे प्रमाण वाढावे व नागरिकांना लसीकरण करुन घेण्­यासाठी प्रोत्­साहन मिळावे यासाठी १५ ऑगस्­ट स्­वातंत्र्य दिनापासुन ते ३० सप्­टेंबर या कालावधीत लसीकरण करुन घेणा-या शहरातील नागरिकांसाठी विशेष बक्षीस योजना राबविण्­यात येत आहे. या योजनेंतर्गत ७५ विजेत्यांनी प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. प्रत्­येक आठवड्यास १० विजेते निवडण्­यात येणार आहेत.

लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनेक दि. १५ ते २० ऑगस्ट तसेच दि. २२ ते २७ ऑगस्ट या कालावधीत शहरातील लसीकरण केंद्रावर लस घेतलेल्­या लाभार्थ्यांमधुन प्रत्­येक आठवड्यास १० याप्रमाणे पहिल्­या दोन आठवड्यातील एकूण २० लाभार्थ्यांची लकी ड्रॉ सोडतीद्वारे निवड करण्­यात आली आहे. दि. १५ ते २० ऑगस्ट या कालावधीत बक्षीस विजेते अलीमुनबी बशीर शेख (इंडियानगर), शोभा प्रल्हाद पांचाळ (नारायणनगर), ज्योती संपतराव जगदाळे (इंडियानगर), बनशेळकीकर विनया सुधीर (शारदा नगर), मारुती प्रल्हादराव वाघे (भोई गल्ली), आशा प्रभाकरराव पोलकर (मळवटी रोड), शिवकल्याणी शिरीष गारटे (मुक्ताई नगर), अजय चिलकेवार (सुतमिल रोड), प्रभा अंगद गुट्टे (मंत्री नगर), स्वाती हेमंत धर्माधिकारी (देशपांडे गल्ली), दि. २२ ते २७ ऑगस्ट या कालावधीत शहरातील लसीकरण केंद्रावर लस घेतलेले विजेते लाभार्थी अनुसया नामदेव नरहरे (दीपज्योती नगर), विशाल बाबासाहेब ओव्हाळ (बौद्ध नगर), राऊतराव करण प्रभू (खरोसा), प्रकाश गोंिवदराव बंडापल्ले (लातूर), वैष्णवी सतीषराव टाकेकर (व्यंकटेश
नगर), श्रावणी सदानंद महती (श्रीकृष्ण नगर), नागनाथ गोविंद दिवटे (श्री नगर), शिवकन्या प्रभाकर साखरे (बजरंग चौक), शितल किशोर वाघमारे (गांधी नगर), संगीता प्रदीप देशमुख (आदर्श कॉलनी).

तरी विजेत्या लाभार्थ्यांनी दि. ७ सप्टेंबर रोजी उपायुक्त यांचे कार्यालय, महानगरपालिका मुख्­य कार्यालय, मेन रोड लातूर येथे आधारकार्डची मूळ प्रत व एक झेरॉक्स प्रतिसह उपस्थित रहावे, व आपले रोख बक्षीस घेवून जावे, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. दि.०१ सप्टेबर रोजी या विशेष बक्षीस योजनेच्या लकी ड्रॉ सोडतीमधील विजेत्यांना उपायुक्त वीणा पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात ५ विजेत्या लाभार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील, आशा स्वयंसेविका, अतुल थोरात हे उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या