18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeलातूरलातूरात ८ मोटारसायकलींसह साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूरात ८ मोटारसायकलींसह साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी केलेल्या मोटारसायकल बाबत विचारपूस करुन नमूद तीन आरोपीकडून चोरीच्या ८ मोटारसायकली, चोरीचे ४ विविध कंपनीचे मोबाईल असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून मोटार सायकल चोरीचे पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीतील ३ , एमआयडीसी हद्दीतील २ , रेणापूर १, चाकूर १ ,गांधी चौक १ असे येथील ८ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. पुढील कार्यवाहीस्तव नमूद आरोपींना पोलीस ठाणे शिवाजीनगर च्या ताब्यात देण्यात आल्या असून संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बहुरे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव,पोलीस अंमलदार योगेश गायकवाड, तूराब पठाण,राम गवारे, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव , प्रमोद तरडे, नाना भोंग , मोहन सुरवसे, राजेश कंचे, तुराब पठाण, रवी कानगुले, नितीन कठारे यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या