22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeलातूरजळकोटमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची आघाडी

जळकोटमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची आघाडी

एकमत ऑनलाईन

जळकोट : नगरपंचायतीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षाची आघाडी होणार आणि तीन पक्ष मिळून निवडणूक लढविणार असे वृत्त दि ६ डिसेंबरच्या अंकात एकमतमधून प्रसिद्ध केले होते. या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून जळकोट नगरपंचायत निवडणुकीसाठी या तिन्ही पक्षांची आघाडी झाली आहे.

काँग्रेस पक्षाला ८ जागा, तर राष्ट्रवादीला सात जागा देण्यात आल्या असून शिवसेनेला दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. वार्ड क्रमांक ३, ५, ८, १०, १२, १३, आणि १६ हे प्राभाग राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आले असून १,२,४, ७, ९ ,११ ,१४ ,१५ हे ८ वार्ड काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत तर प्रभाग क्रमांक ६ व १७ शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत.

जवळपास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निश्चीत झाले आहेत तसेच शिवसेनेने आपले उमेदवार निश्चीत केले आहेत . प्रभाग क्रमांक एक मधून संग्राम नामवाड, क्रमांक २ मधून मीनाक्षी ओमकार धुळशेटे, क्रमांक ४ मधून मुमताज बागवान, क्रमांक ४ मधून वर्षा सचिन सिद्धेश्वरे, क्रमांक ५ मधून गंगाबाई डांगे, क्रमांक ६ मधून शिवलिंग नागोराव धूळशेटे, क्रमांक ७ मधून वाहिदा अजिज मोमिन, क्रमांक ८ मधून नितीन धुळशेटे, क्रमांक ९ मधून गोपाळकृष्ण गबाळे, क्रमांक १० मधून खादर लाटवाले, क्रमांक ११ मधून अश्विनी महेश धूळशेटे,क्रमांक १२ मधून सुरेखा गवळे, क्रमांक १३ मधून संगीता अविनाश मठदेवरू, क्रमांक १४ मधून नागोराव धूळशेटे, क्रमांक १५ मधून मन्मथ किडे, क्रमांक १६ मधून प्रभावती चंद्रकांत कांबळे, क्रमांक १७ मधून सुमनबाई त्र्यंबक देशमुख, या उमेदवारांची काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच शिवसेनेकडून उमेदवारी निश्चीत झाली आहे.

महा विकास आघाडीचे काँग्रेसचे संपर्कप्रमुख पृथ्वीराज शिरसाट, अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिराजुद्दीन जहागीरदार, मांजरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मन्मथ किडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धूळशेटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अशोकराव डांगे, शिवसेनेचे युवा तालुकाप्रमुख उमाकांत इमडे, शहराध्यक्ष मनोज बोदले, शंकर सोपा, राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष दस्तगीर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत दि ७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्यात आले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या