27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeलातूरजिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ८४.१९ टक्के पाणीसाठा

जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ८४.१९ टक्के पाणीसाठा

एकमत ऑनलाईन

लातूर : पावसाची लातूर जिल्ह्याची वार्षिक सरासरी ८०२.१३ मी. मी एवढी आहे. यंदा १ जूनपासन आतापर्यंत जिल्ह्यात ८५२.३९ मी. मी. इतका पाऊस पडला आहे. पावसाची टक्केवारी १०६.२६ एवढी आहे. त्यामुळे यंदा लातूर जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प भरले आहेत. मांजरा प्रकल्पात ९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे तर निम्न तेरणा प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांत ६६.९०, १२७ लघू प्रकल्पांत ८१.०८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांत एकुण पाणीसाठा ८४.१९ टक्के आहे. मांजरासह इतरही प्रकल्पांत अद्यापही पाण्याचा येवा सुरुच असून हे प्र्रकल्प काही दिवसांत पुर्ण क्षमतेने भरतील, अशी परिस्थिती आहे.

दुुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या लातूर जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात २११.६३८ दशलक्षघनमीटर पाणीसाठा आहे.उपयुक्त पाणीसाठा १६४.५०८ तर उपयुक्त पाण्यासाठ्याची टक्केवारी ९२.९६ एवढी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील निम्न तेरणा प्रकल्पात १२१.१८८ दशलक्षघनमीटर पाणीसाठा आहे.उपयुक्त पाणीसाठा ९१.२२१ असून हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला आहे. जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प आहेत. त्यातील तावरजा प्रकल्पात २.९५४ उपयुक्त पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी १४.५२ आहे. व्हटी प्रकल्पात १.८५९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी २२.४४ इतकी आहे. रेणापूर प्रकल्पात ६.१९५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ३०.१४ टक्के आहे. तिरु प्रकल्पात १३.०२० दलघमी पाणी आहे तर उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ८५.१५ एवढी आहे. देवर्जन, साकोळ, घरणी आणि मसलगा हे चारही मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरलेले आहेत.

जिल्ह्यातील १२८ लघु प्रकल्पांपैकी लातूर तालुक्यातील गोंदेगाव, वासनगाव, चिकुर्डा तर रेणापूर तालुक्यातील गरसोळी हे चार प्रकल्प अद्यापही जोत्याखाली आहेत. तर ७८ प्रकल्प शंभर टक्के, १२ प्रकल्प ७५ टक्के, ९ प्रकल्प ५१ ते ७५ टक्के, १५ प्रकल्प २५ ते ५० टक्के तर १० प्रकल्प २५ टक्क्यांच्या खाली आहेत. चार समन्वयी प्रकल्पांपैकी ३ शंभर टक्के भरले असून एका प्रकल्पात ५१ ते ७५ टक्के पाणीसाठा आहे.

मांजरा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत
लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ-दहा दिवसांत चांगला पाऊस पडत असल्याने मांजरा प्रकल्पातील पाणीसाठ्यात लक्षणिय वाढ होत आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकुण पाणीसाठा २१२.५४६ दशलक्षघनमीटर असून हा प्रकल्प केव्हाही पुर्ण क्षमतेने भरेल, अशी पस्थिती असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

हालकी गावात बहरली झेंडूफुलांची शेती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या