20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeलातूरजिल्ह्यातील १४२ प्रकल्पांत ८६.०५ टक्के उपयुक्त पाणी

जिल्ह्यातील १४२ प्रकल्पांत ८६.०५ टक्के उपयुक्त पाणी

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यातील २ मोठे, ८ मध्यम व १३६ लघू व ४ समन्वय लघू प्रकल्प असे एकुण १४२ प्रकल्पांत ८६.०५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. दरम्यान लातूर शहरासाठी महत्वपूर्ण असलेल्या मांजरा धरणात दि. १ ऑक्टोबर रोजी ६६.०४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे तर निम्न तेरणा पुर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत आहे.

यंदाच्या जुनमध्ये लातूर जिल्ह्यात ब-यापैकी पाऊस पडला. जुलैमध्येही पावसाने साथ दिली मात्र शेवटच्या आठवड्यात व ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाचा खंड पडला. परिणामी उगवलेली कोवळी पिके करपू लागली. मध्यच शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला. पिवळा मोझ्याक आला त्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. दरम्यान पुन्हा पाऊस सक्रीय झाला आणि जिल्ह्यातील काही तालुक्यांत संततधार तर काही तालुक्यांत अतिवृष्टी झाली. या पावसाचाही फटका पिकांना बसला. पावसाने पिकांची नासाडी केली असली तरी ब-यापैकी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील नदी, नाले, बराज, लहान, मोठे प्रकल्प, पाझर तलाव, ओढे वाहते झाले. सर्वत्र पाणीच पाणी झाले. लातूर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या जवळपास पाऊस पडला असला तरी मांजरा प्रकल्पाच्या प्रकल्पीय क्षेत्रात पाऊस कमी पडल्याने अद्यापही मांजरा धरण भरले नाही. गेल्या चार-पाच दिवसांतील पावसामुळे मांजरा धरणातील उपयुक्त पाण्याची टक्केवारी ८६.०५ टक्क्यांपर्यंत गेली आहे.

लातूर तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात आज घडीला २५.०७४ दशलक्षघनमीटर पााणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ८६.९६ एवढी आहे. रेणापूर तालुक्यातील रेणापूर, व्हटी, उदगीर तालुक्यातील देवर्जन , शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ व घरणी हे पाच मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. उदगीर तालुक्यातील तिरु मध्यम प्रकल्पात ८७.७७ टक्के तर निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात ९४.७२ टक्के पाणीसाठा आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या