22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeलातूरजिल्ह्यातील ८७ प्रकल्प शंभर टक्के भरले

जिल्ह्यातील ८७ प्रकल्प शंभर टक्के भरले

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात १३ व १४ ऑक्टोबर रोजी झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर काही दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मोठे, मध्यम व लघू असे ८७ प्रकल्प पाण्याने शंभर टक्के भरले आहेत. या सर्व प्रकल्पांत आता ८६.२० टक्के पाणीसाठा झाला आहे. परतीच्या पावसाने पुन्हा एकदा लातूर जिल्ह्यात चांगली हजेरी लावल्याने प्रकल्पांतील पाणीसाठा वाढला असून त्याचा फायदा रब्बी हंगामात होणार आहे.

लातूर शहरासह केज, अंबाजोगाई, कळंब आदी शहरांना पाणीपुरवठा होणारे मांजरा धरण दि. २७ ऑक्टोबर रोजी शंभर टक्के भरले. हे धरण उभारण्यात आल्यापासून धरण भरण्याची ही १४ वी वेळ आहे. मांजरा धरणात एकुण पाणीसाठा २२४.०९३ दलधमी एवढा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील निम्न तेरणा धरणही शंभर टक्के भरले आहे. या धरणात १२१.१८८ दलघमी पाणीसाठा आहे. उदगीर तालुक्यातील देवर्जन, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ व घरणी हे तीन मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. तावरजा प्रकल्पात ११.१६३ दलघमी, मसलगा प्रकल्पात १४.६७६ दलघमी, व्हटी प्रकल्पात ३.४६९ दलघमी, तिरु प्रकल्पात २१.०५० दलघमी एवढा पाणीसाठा आहे.

लातूर तालुक्यातील कातपूर, औसा तालुक्यातील चिंचोली जो., कारला, तुंगी, नणंद, सोमदुर्ग, सारोळा, माळकोंडजी, येल्लोरी, खुंटेगाव साठवण तलाव, शिवली साठवण तलाव, उदगीर तालुक्यातील एकुर्की, पिंपरी, गुरधाळ, निडेबन साठवण तलाव, डाऊळ हिप्परगाव साठवण तलाव, गुडसूर साठवण तलाव, कोदळी साठवण तलाव, चांदेगाव साठवण तलाव, निलंगा तालुक्यातील शेडोळ, कासार बालकुंदा, हाडगा, माळेगाव, हागरगा, हणमंतवाडी साठवण तलाव, पानचिंचोली साठवण तलाव, अहमदपूर तालुक्यातील धसवाडी, सोनखेड, मोघा, कोप्रा किनगाव साठवण तलाव, कौडगाव साठवण तलाव, येस्तार साठवण तलाव, येलदरी साठवण तलाव, ढाळेगावा साठवण तलाव, तांबट सांगवी साठवण तलाव, हगदळ-गुगदळ साठवण तलाव, अहमदपूर साठवण तलाव, अंधोरी साठवण तलाव, काळेगाव साठवण तलाव, उगिलेवाडी साठवण तलाव, सावरगाव साठवण थोट, हंगेवाडी साठवण तलाव,

मोळवण साठवण तलाव, चाकुर तालुक्यातील शिवणखेड, अंबुलगा साठवण तलाव, उजळंब साठवण तलाव, देवणी तालुक्यातील बोकणी, अरसनाळ, दवन हिप्परगा, दरेवाडी-कवठाळा साठवण तलाव, अनंतवाडी साठवण तलाव, वडमुरंबी साठवण तलाव, गुरनाळ साठवण तलाव, आनंदवाडी साठवण तलाव, लासोना साठवण तलाव, जळकोट तालुक्यातील जंगमवाडी, ढोरसांगवी, हावरगा, चेरा साठवण तलाव, धोडवाडी साठवण तलाव, सोनाळा साठवण तलाव, डोंगरगाव साठवण तलाव, गुत्ती क्रमांक १ साठवण तलाव, गुत्ती क्रमांक २ साठवण तलाव, औसा तालुक्यातील दापेगाव साठवण तलाव, उदगीर तालुक्यातील नागलगाव,वांगदरी साठवण तलाव, करखेली साठवण तलाव, अहमदपूर तालुक्यातील नागझरी साठवण तलाव, रेणापूर तालुक्यातील सय्यदपूर साठवण तलाव,चाकुर तालुक्यातील केंद्रेवाडी साठवण तलाव, रावणकोळा साठवण तलाव, माळी हिप्परगा साठवण तलाव शंभर टक्के पाण्याने भरले आहेत.

मुंबईच्या पुर्व मुक्त मार्गास स्व. विलासराव देशमुख यांचे नाव द्या – पालकमंत्री अस्लम शेख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या