22.7 C
Latur
Wednesday, August 12, 2020
Home लातूर औसा पालिकेकडे वीज बिलाचे थकले ८८ लाख

औसा पालिकेकडे वीज बिलाचे थकले ८८ लाख

एकमत ऑनलाईन

औसा : औसा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा व पथदिव्यांपोटी जून अखेर ८८ लाख २४ हजार ७२१ रुपये थकित असून थकित वीज बिलामुळे वीज वितरण कंपनीने शहरातील बसस्थानक ते औसा टी पाईंट या मुख्यरस्त्यावरील दिवाबत्तीचा वीजपुरवठा दि २२ जुलैपासून खंडित केला होता. तो १०दिवसानंतर पूर्ववत सुरळीत करण्यात आला आहे.

औसा शहरातील दिवाबत्तीसाठी वीज वितरण कंपनीचे एकूण ६१ ठिकाणी वीज जोडणी असून यापोटी नगरपालिकेने जून २०२० अखेर ५९ लाख २४ हजार ६३६ रुपये थकीत आहेत तर पाणी पुरवठ्याच्या ८८ ग्राहक संख्येचे जून अखेर २९ लाख ८४ रुपये बाकी असून जून २०२० अखेर एकूण ८८ लाख २४ हजार ७२१ रुपये थकीत आहेत. थकीत बिलाचा भरणा करण्याबाबत वीज वितरण कंपनीने नगरपालिकेला वेळोवेळी पत्रव्यवहार केला असल्याचे वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता व शहर अभियंता यांनी सांगितले आहे व दि १७ जुलै रोजी स्मरणपत्रही दिले असल्याचे सांगितले.

नगरपालिकेने ३० एप्रिल २०२० रोजी ३ लाख ८६ हजार ५७२ रुपये भरणा केलेला आहे. त्यानंतर चार महिन्याचे नियमित वीज बिलाचा भरणा झालेला नसल्याने वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानेच दिवाबत्तीचा वीजपुरवठा खंडित केला होता मात्त याप्रकरणी नगाराध्यक्ष अफसर शेख यांनी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केली.कोरोना संकटाच्या काळात प्रतिबंधित क्षेत्रात वीजपुरवठा खंडित करुन नगार पालिकेला अडचणीत आणले जात आहे .अशा आशयाची तक्रार केली होती व वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती.

माहे मार्च व एप्रिल या दोन महिन्यांचे दिवाबत्तीचे बील चार लाख १० हजार २३९ रुपये तर पाणीपुरवठा विभागाचे बील चार लाख ३३ हजार ३८४ रुपये असे दोन महिन्याचे एकूण बील आठ लाख ४३ हजार ६२४ रुपये इतकेआहे. या बीलाची रक्कम नगरपालिकेने भरणे अपेक्षित होते परंतु नगरपालिकेने वीज बिल भरणा केला नसल्याने अखेरीस वीज वितरण कंपनीने २२ जुलै रोजी दिवाबत्तीचे (पथदिवे) चार जोडणीचा वीज पुरवठा खंडित केला. लातूर हनुमान वेस ते औसा टी पाईट या मार्गावरील चार जोडणीचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून औसा शहराचा मुख्य रस्ता हनुमान मंदिर ते औसा टी पार्इंट हा परिसर अंधारात होता ३० जुलै रोजी ही जोडणी वरिष्ठांच्या आदेशाने पुन्हा सुरू करण्यात आली असल्याचे शहर अभियंता हळीघोंगडे यांनी सांगितले.

वीज वितरण कंपनीकडे केला रकमेचा भरणा : मुख्याधिकारी
नगरपालिकेकडे थकित असलेल्या रक्कमेपोटी जिल्हाधिका-यांच्या आदेशाने ८९ लाख रुपये सन २०१८ मध्ये भरणा केला आहे. ही रक्कम समायोजित करणे आवश्यक आहे. उर्वरित रक्कमेची तपशीलवार माहिती मागितली आहे परंतु वीज वितरण कंपनीकडून तपशील मिळत नाही. शिवाय मार्च महिन्यांपासून कोव्हिड संकटात नगरपालिकेचे सर्व कर्मचारी शहरात विविध मोहिम राबवित आहेत त्यामुळे वसुली होऊ शकलेली नाही.पालिका आर्थिक अडचणी आहे. वीज वितरणने करोनाच्या संकटकाळात सहकार्य करावे असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी सांगितले.

Read More  लातूर शहरात पावसाची हजेरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,143FansLike
101FollowersFollow