28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूर८८ वर्षांच्या आजी-आजोबांनी केली कोरोनावर मात

८८ वर्षांच्या आजी-आजोबांनी केली कोरोनावर मात

एकमत ऑनलाईन

लातूर : शहरातील ८८ वर्षांच्या आजी-आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे दी. २४ जुलै रोजी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत येथील प्रभुराज प्रतिष्ठाणच्या वतीने या वयोवृद्ध आजी-आजोबांचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले.

येथील जुनी कापडगल्ली परिसरात कांही दिवसापूर्वी वयाने ८८ वर्ष असलेले वयोवृद्ध आजी- आजोबांचा स्वॅब तपासणी अहवाल कोरोना पॉजिटिव्ह आला होता़ त्यांना उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले होते़ कांही दिवसांनी त्यांचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. वयाने ८८ वर्ष असलेले या दोघांची जिद्द आणि आत्मविश्वास यामुळेच त्यांनी कोरोनावर मात करत तरुण पिढी समोर एक उदाहरण ठेवले आहे.

कोरोनाबधित रुग्ण बरा होतो, भयभीत होऊन घाबरुन जाण्याचे कारण नाही हा संदेशच जून त्यांनी दिला़ या आजी-आजोबांच्या धैर्यामुळे इतरांचे मनोबल व आत्मविश्वास वाढण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. कोरोनाशी यशस्वी लढा देऊन जिंकलेल्या या आजी-आजोबांचा प्रभूराज प्रतिष्ठाणने पुष्पवृष्टीने स्वागत केले. यावेळी प्रभुराज प्रतिष्ठाणचे अ‍ॅड़ अजय कलशेट्टी, दत्ता ढगे, विनायक महिंद्रकर, जितेंद्र ढगे, वामन पांडे, गणेश शाबादे, संतोष मेंगशेट्टी, जयसिंग परदेशी, संतोष महिंद्रकर व कोरोनामुक्तचे परिवार उपस्थित होता.

Read More  १६१ कंटेन्मेंटझोवर ४८३ कर्मचारी कार्यरत

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या