21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeलातूर९० टक्के ऑक्सिजन बेड रिकामे

९० टक्के ऑक्सिजन बेड रिकामे

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यात २ हजार १७९ ऑक्सिजन बेडची संख्या आहे. त्यापैकी १६५ बेडवर रुग्ण भरती आहेत. २०१४ ऑक्सिजन बेड रिकामे आहेत तर आयसीयू बेडची संख्या ६६२ असून त्यापैकी ७० आयसीयू बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. ५९२ आयसीयू बेड रिकामे आहेत. आजपर्यंत लातूर जिल्ह्यात ८९८८५ रुग्ण कोरोनाबधित आढळून आले आहेत. त्यापैकी ८६९२४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

लातूर जिल्ह्यात गेल्या १४ ते १५ महिन्यांपासून कोरोना विषाणुच्या संसर्गाने धुमाकुळ घातला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेने तर नागरिकांमध्ये धडकी भरवली होती. संपूर्ण आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र २४ तास वैद्यकीय सेवेत गुंतली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. लॉकडाऊनचे अनलॉकमध्ये रुपांतर झाल्याने आता जनजीवन पुर्वपदावर येत आहे. गेल्या १५ दिवसांत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने घसरत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ८३ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलपैकी २५ हॉस्पिटलमध्ये रुग्ण नसल्याने डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल बंद करण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिका-यांच्या परवानगीने १५ पैकी ४ कोविड केअर सेंटर बंद झाले आहेत.

लातूर जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यामध्ये प्रचंड रुग्णसंख्या वाढल्यामूळे रुग्णांना बेड मिळणे त्यातल्या त्यात ऑक्सिजन बेड मिळणे मुश्किलीचे झाले होते. या दोन महिन्यांमध्ये रुग्णंसख्येचा उच्चांक होता. ऑक्सिजन, औषध आणि बेडची कमतरता होती. मात्र आता संसर्गाची तीव्रता एकदम कमी झाल्याने ९० टक्के ऑक्सिजन बेड रिकामे आहेत. जिल्ह्यातील आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८९८८५ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६२३ आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत २३३८ रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८६९२४ आहे.

२२३ व्हेंटिलेटर रिकामे
गंभीर मेकॅनिकल व्हेेंटिलेटरची संख्या २९९ असून त्यापैकी सहा व्हेंटिलेटरवर रुग्ण आहेत. यातील २२३ व्हेंटिलेटर रिकामे आहेत. बीआयपीएपी व्हेंटिलेटरची संख्या ४०० असून त्यापैकी १२ व्हेंटिलेटरवर रुग्ण असून ३८८ बीआयपीएपी व्हेंटिलेटर रिकामे आहेत.

नाल्यात वाहुन गेल्याने ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू; वृद्धास वाचविण्या ऐवजी अनेकांनी केला व्हिडीओ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या