19.5 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यातील ९२९ पैकी ९२४ गावे कोरोनामुक्त

लातूर जिल्ह्यातील ९२९ पैकी ९२४ गावे कोरोनामुक्त

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणुची पहिली आणि दुसरी लाट खुपच त्रासदायक ठरली. समाजातील सर्वघटकांना सर्वांगाने स्पर्श करुन गेलेल्या या दोन्ही लाटांचे दु:खद प्रसंग अनेकांनी अनूभवले. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. त्यामुळे आणखी धडकी भरली होती. परंतु, तिसरी लाट अद्यापतरी आली नाही उलट कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने सर्वांच दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत असल्याने हळूहळू कोरोना संपत चालला आहे. जिल्ह्यातील ९२९ गावांपैकी ९२४ गाव कोरोनामुक्त झाली आहेत.

लातूर जिल्ह्यात आजपर्यंत ३०७०३८ व्यक्तींच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ३०६७४७६ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झालेला आहे. २९२ व्यक्तींचा अहवाल प्रलंबीत आहे. ३२३४ व्यक्तींची आरटीपीसीआर पुर्नतपासणी करण्यात आली आहे. २५९४ आरटीपीसीआर चाचण्या नाकारण्यात आल्या आहेत. २६४३९८ व्यक्तींच्य आरटीपीसीआर चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत तर ३६५२० व्यक्तींच्या आरटीपीसीआर चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. ५६०२४ व्यक्तींच्या रॅपीड अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत तर ४६६८८९ व्यक्तींच्या रॅपीड अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. आजघडीला २८ रुग्ण उपचार घेत आहेत. १८ रुग्ण आयसीयुमध्ये आहेत. ३ रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटीलेटरवर आहेत. ५ रुग्ण गंभीर बायपॅप व्हेंटीलेटरवर आहेत. १२ रुग्ण मध्यम ऑक्सिजनवर, ३ रुग्ण मध्यम परंतू ऑक्सिजनवर नाहीत तर ५ रुग्ण सौम्य लक्षणाची आहेत. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत ९२५४४ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी ९००७३ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. २४४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लातूर जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. ‘मिशन कवच-कुंडल’ अंतर्गत लसीकरणाला गती आली आहे. जिल्ह्यातील गावोगावी लसीकरणाची शिबिरे घेतली जात आहेत. लसीकरणासाठी आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबविण्यात येत आहे. नागरिकांना लस घेणे सोयीचे जावे, यासाठी जागोजागी लसीकरण केंद्र उघडण्यात आले आहेत. गाव, वाडी, वस्त्या, तांड्यावर जाऊन लसीकरण केले जात आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनेही शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत. खाजगी हॉस्पिटलमध्येही लसीकरण केंद्र सुरु करण्यात आल्याने लसीकरणाचा टक्का वाढतो आहे. लसीकरण हाच कोरोना प्रतिबंधाचा उपाय असल्यामुळे सर्वच नागरिकांनी लस घ्यावी, अशी व्यवस्था महानगरपालिकच्या वतीने करण्यात आली आहे. लसीकरणाविषयी जनजागृतीही मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

जिल्ह्यातील फक्त ५ गावांत बाधित रुग्ण
लातूर जिल्ह्यात गावं, वाडी, तांडे मिळून ९२९ गावांची संख्या आहे. त्यापैकी ९२४ गावं कोरोनामुक्त झाल्याने आता फक्त ५ गावांंमध्ये सद्य:स्थितीत किरकोळ प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आहेत. लसीकरणात घेतलेली गती आणि कोरोना नियमांचे होत असलेले काटेकोर पालन यामुळे कोरोनामुक्त होण्यात लातूर जिल्ह्याला यश मिळत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या