28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeलातूर९३ वी आवर्तन मासिक संगीत सभा आज

९३ वी आवर्तन मासिक संगीत सभा आज

एकमत ऑनलाईन

लातूर : शास्त्रीय संगीतातील रसिक वर्ग तयार व्हावा व अभिजात शास्त्रीय संगीताचे संवर्धन व्हावे या उद्देशाने आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने मागील ९२ महिन्यांपासून सुरु असलेल्या आवर्तन मासिक संगीत सभेला आज ९३ महिने पूर्ण होत आहेत. आज दि. २० रोजी सायंकाळी ६.३० वाजता अष्टविनायक मंदिर गणेश हॉल येथे होणा-या या मासिक संगीत सभेमध्ये औरंगाबाद येथील प्रसिद्ध युवा पखवाज वादक गणेश भुतेकर यांचे पखवाज सोलो वादन होणार आहे, व त्यांना संवादिनी साथ संगत दिनेश डोळे, औरंगाबाद हे करणार आहेत.

मुळातच संगीताची व्याख्या गायन वादन व नृत्य असल्यामुळे या तीनही कलेंचे संवर्धन व्हावे व विविध कला प्रकारांचा रसिकांना आस्वाद घेता यावा व संगीत शिकणा-या नवीन संगीत साधकांना या कलाप्रकारांची जवळून ओळख व्हावी नवनवीन वाद्ये त्यांना जवळून पाहता यावीत ऐकता यावीत व त्यांच्या स्वत:च्या संगीत साधने मध्ये याचा उपयोग व्हावा या हेतूने विविध वाद्य विविध नृत्य प्रकार गायनातील ख्याल गायन तसेच धृपद धमार गायन इत्यादी कलाप्रकार या आवर्तन मासिक संगीत सभेमध्ये सादर झाले आहेत व रसिकांनी याचा मनमुराद आनंद घेतलेला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लातूरमधील ज्येष्ठ तबलावादक रमाकांत स्वामी व ज्येष्ठ पखवाजवादक गोपाळ जाधव हे उपस्थित राहणार आहेत. आज होणा-या मासिक संगीत सभेसाठी आपण सर्व रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या