30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeलातूरऔसा प्रशासनास झोपण्यासाठी देण्यात येणार गादी-पलंग

औसा प्रशासनास झोपण्यासाठी देण्यात येणार गादी-पलंग

एकमत ऑनलाईन

औसा (प्रतिनिधी) : औसा तालुक्यासह विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतीपिकाची पाहणी करण्यासाठी कार्यालयाबाहेर पडत नसलेल्या प्रशासनासह, कृषीमंत्री महोदयांना झोपा काढण्यासाठी पलंग आणि गादी भेट देऊन आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे औसा तालुकाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनी दिली आहे.

चालू खरीप हंगामात दुबार- तिबार पेरणी करूनही सदोष बियाणांमुळे सोयाबीन हे वान न उगवल्याने आणि नंतर काबाड कष्ट करून हाता-तोंडाशी आलेले सोयाबीनसह मूग,उडीद, सूर्यफूल व पिवळा इत्यादी नगदी पिकेअतिवृष्टीने उद्ध्वस्त झाले आहे.उभा ऊस वादळी वा-यामुळे भुईसपाट झाल्यामुळे शेतकरी मोठ्या दुष्टचक्रात सापडला आहे, झालेल्या नुकसानीमुळे शेतक-यांचे आर्थिक गणित बिघडले असून संपूर्ण शेती व्यवसाय कोलमडून पडला आहे. यामुळे शेतक-यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून अशा परिस्थितीत खबरदारी आणि जबाबदारीच्या वल्गना करणा-या आणि शेतक-यांच्या बांधावर जाण्याचे केवळ कागदोपत्री आदेश काढणा-या या शासनाचा एकही प्रतिनिधी अथवा प्रशासनातील कुठलाही अधिकारी गाव शिवाराच्या आत फिरकला आला नाही.

कार्यालयात बसून शेतकरी वर्गाची झालेली ही दयनीय अवस्था पाहणा-या सुस्त व निर्ढावलेल्या कृषी अधिका-यांसह इतर यंत्रणा व कृषिमंर्त्यांनी कार्यालयाबाहेर पडून अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाची पाहणी व पंचनामे करावेत आणि शेतक-यांना तात्काळ आर्थिक स्वरूपाची मदत द्यावी . शेती पिकाच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी पिक विमा कंपनीस इसार,अग्रीम मावेजा (अ‍ॅडव्हान्स) म्हणून पन्नास टक्के रक्कम त्वरीत मंजूर करून खात्यावर जमा करण्याचे आदेश द्यावेत. जेणेकरून शेतक-याना दसरा व दिवाळी सण साजरा करता येईल आणि रब्बीच्या पेरणीस थोडीफार मदत होईल.

येत्या सोमवारपर्यंत तालुक्यात सरसकट पंचनामे करून याविषयी कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संबंधित प्रशासनास कार्यालयात बसून झोपा काढण्यासाठी पलंग व गादी भेट देऊन आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे मनसेचे औसा तालुकाध्यक्ष शिवकुमार नागराळे, औसा शहराध्यक्ष मुकेश देशमाने शहराध्यक्ष, कृषी तालुकाध्यक्ष महेश बनसोडे, जीवन जंगले, धनराज गिरी विकास लांडगे ,राजेंद्र कांबळे ,सतीश जंगाले ,अमोल परिहार ,सचिन बिराजदार ,महादेव गुरूशेट्टे ,अतिक शेख, प्रकाश भोंग, गुणवंत लोहार , तानाजी गरड, गोविंद चव्हाण,विवेक महावरकर,उमाकांत गोरे,दशरथ ठाकूर, बालाजी शिनगारे,सोहेल शेख,अमोल थोरात,अनिल बिराजदार,शंकर शिंदे,गणेश काळे, समाधान फुटाणे, हणमंत येणगे आदींनी दिला आहे.

पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाखा व्यवस्थापकाची तात्काळ बदली करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या