22.9 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeलातूरलातूर भाजपाला मोठा धक्का

लातूर भाजपाला मोठा धक्का

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर भाजपला मोठा धक्का देत भाजपाचे अल्पसंख्यांक प्रदेश सचिव तथा माजी महापौर अख्तर मिस्त्री व भाजपचे माजी महापौर सुरेश पवार यांचे चिरंजीव घनश्याम सुरेश पवार यांनी दि. १० जून रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर २०१९ च्या लातूर शहर शहर विधानसभेची निवडणुक लढलेले राजा मणियार यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश घेतला.

राष्ट्रवादी काँग्रगेसच्या २२ व्या वर्धानदिनानिमित्त मुंबईतील राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफु ल्ल पटेल, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनिल तटकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मंत्री बाळासाहेब पाटील, पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय शेटे यांच्या उपस्थितीत माजी महापौर अख्तर मिस्त्री, घनश्याम सुरेश पवार, राजा मणियार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

लातूर शहर महानरगपालिकेची स्थापना २५ ऑक्टोबर २०११ रोजी झाली. त्यानंतच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत अख्तर मिस्त्री यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणुक लढविली व ती जिंकली. अडीच वर्षाच्या आरक्षणानूसार पहिल्या महापौरपदाचा मान काँग्रेसच्या नेत्यांनी प्रा. डॉ. स्मिता खानापूरे यांना दिला. त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर अख्तर मिस्त्री यांना महापौर होण्याचा बहुमानही काँग्रेसच्याच नेत्यांनी दिला. दरम्यान अख्तर मिस्त्री यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांना महापौरपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अख्तर मिस्त्री यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता व त्यांना भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव हे पद देण्यात आले. एक-दिड वर्षांपूर्वी केंद्रातील भाजपा सत्ताधा-यांनी ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ चा मुद्दा पुढे आणल्याने तो मागे घ्यावा, यासाठी अख्तर मिस्त्री यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपाचा राजीनामा दिला होता. अखेर त्यांनी गुरुवारी भाजपाला धक्का देत राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश केला.

लातूर शहर महानरगपालिकेच्या द्वितीय सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान उपमहापौर राहिलेले सुरेश पवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत भाजपाने काठावरील बहुमत मिळवत महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली आणि सुरेश पवार महापौर झाले. त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पक्षांतर्गत नाराजी दुर करण्यातच गेला. महापौर म्हणून त्यांची कारकिर्द निष्क्रीय राहिली. त्यांचे चिरंजीव घनश्याम सुरेश पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. राजा मणियार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर २०१९ च्या लातूर शहर शहर विधानसभेची निवडणुक लढविली होती. त्यांनीही परत राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता धरला.

निमंत्रण होते, प्रवेश केला भारतीय जनता पार्टीत अल्पसंख्यांक प्रदेश सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली. परंतुू, भाजपाने सीएए आणि एनआरसी आणल्याने भाजपामधील अल्पसंख्यांक पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. भाजपाने सीएए व एनआरसी मागे घ्यावे, म्हणून आम्ही सर्वांनी भाजपाचा राजीनामा दिला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याबाबत निमंत्रण होते, प्रवेश केला, असे अख्तर मिस्त्री यांनी सांगीतले.

‘तो’ त्याचा ‘निर्णय’
भाजपाचे माजी महापौर सुरेश पवार यांचे चिरंजीव घनश्याम पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तो त्याचा निर्णय आहे. या संदर्भाने माझी आणि घनश्यामची चर्चा झाली होती. मी नको असे म्हणालो होतो परंतु, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेतला. मी मात्र भाजपामध्येच आहे, असे सुरेश पवार म्हणाले.

आघाडी सरकार पाच वर्ष तर टिकेलच, पण पुढच्या निवडणुकीतही एकत्र लढू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या