24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूररजा मंजुरीसाठी शिक्षिकेकडून घेतली ६ हजार रूपयांची लाच

रजा मंजुरीसाठी शिक्षिकेकडून घेतली ६ हजार रूपयांची लाच

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर येथील सदानंद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व लिपीकाने संगणमत करून शिक्षीकेला एक आठवडयाची रजा मंजूर करण्यासाठी ७ हजार रूपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीअंती तक्रारदाराकडून ६ हजार रूपयांची लाच लिपीकाने स्विकारून ती मुख्याध्यापकाकडे देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले.

सदानंद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर जगन्नाथ पोतदार (५५) व लिपीक शशिकांत विठ्ठलराव खरोसेकर ५४) याने तक्रारदारांची शिक्षिका पत्नी यांची एक आठवडा अर्जित रजा मंजूर करणेकरीता तक्रारदार यांना शाळेत बोलावून पांचासमक्ष सुरुवातीस ७ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. दि. २१ सप्टेंबर रोजी लिपीक शशिकांत खरोसेकर याने तडजोडी अंती एक हजार कमी द्या म्हणून ६ हजार रूपयांची पंचासमक्ष लाचेची मागणी केली.

त्यानंतर लाच मागणी केलेली रक्कम ६ हजार रूपये लिपीक शशिकांत खरोसेकर याने सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेत शाळेतील मुख्याध्यापक यांचे कार्यालयात पंचासमक्ष स्विकारून मुख्याध्यापक सुधाकर पोतदार यांचेकडे दिली. दोन्ही आरोपितांना जागेवरच लाचेच्या रक्कमेसह रंगेहाथ पकडण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. या घटनेचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हे करीत आहत्ो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या