22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeलातूरराष्ट्रीय छात्र सेनेला राष्ट्रीयस्तरावरील करियरमध्ये उज्ज्वल संधी

राष्ट्रीय छात्र सेनेला राष्ट्रीयस्तरावरील करियरमध्ये उज्ज्वल संधी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीयस्तरावरील युपीएससी, एमपीएससी आणि विविध शासकीय सेवेमध्ये एनसीसी कॅडेटला उज्ज्वल संधी असल्याचे प्रतिपादन ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, लातूरचे कमांंिडग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल संतोषकुमार यांनी बोलताना व्यक्त केले.

५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, लातूरच्या वतीने लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील एनसीसी कॅडेटचे वार्षिक प्रशिक्षण शिबीर येथील जवाहर नवोदय विद्यालयात दि. २८ जून ते ७ जुलै या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा ओपंिनग एड्रेस कार्यक्रम झाला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी विचार मंचावर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य जी. रमेशराव, उपप्राचार्य आर. रामू, प्रा. डॉ. संजय गवई, डेपोटी कमांडर सुभेदार मेजर दीपक कुमार आणि कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना कॅम्प कमांडर लेफ्टनंट कर्नल संतोषकुमार म्हणाले की, या प्रशिक्षण शिबिरात शैक्षणिक मार्गदर्शनासोबत सैनिकी प्रशिक्षण, फायंिरग, ड्रिल, मॅप रींिडग, वेपण ट्रेंिनग, संस्कृतीक कार्यक्रम आधी विविध विषयावर प्रात्यक्षिकासह माहिती मिळणार आहे. याचा सर्व कॅडेटने लाभ घ्यावा असे ते म्हणाले.

यावेळी प्राचार्य जी. रमेशराव यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत आणि एनसीसी गीताने करण्यात आली. या प्रशिक्षण शिबिरामध्ये लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील ४६० कॅडेट सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी लेफ्टनंट चीतमपल्ले डी. एस.,चीफ ऑफिसर मांडवकर अनिल, चीफ ऑफिसर महावीर काळे, थर्ड ऑफिसर चांदणे बाबुराव, लेफ्टनंट अर्चना टाक, लेफ्टनंट सरस्वती वायभासे, लेफ्टनंट हरीभाऊ पावडे, आप्पासाहेब वाघमोडे, सुभेदार सत्यवान जाधव, सुभेदार दिलीप दामोदर, सुभेदार भोपाल सिंग, सुभेदार कच्छवे, नायब सुभेदार शेंडगे दिलीप, हवालदार चित्रपाल सिंग, हवालदार अमनदीप कार्यालयाचे हेड क्लर्क घोगरे बी. व्ही., जयपाल काटकर आदींचे सहकार्य मिळत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या