25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeलातूरऔसा तालुक्यातील सारोळा येथील बालविवाह प्रकरणी आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल

औसा तालुक्यातील सारोळा येथील बालविवाह प्रकरणी आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

औसा : औसा तालुक्यातील सारोळा येथे झालेल्या एका बालविवाह प्रकरणी आठ जणांविरुध्द औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप एकाही आरोपी अटक करण्यात आली नसून त्या मुलीचा नवरा, सासू, सासरा,तसेच आई-वडील यांच्यासह नातेवाईक आणि लग्न लावून देणाऱ्या अज्ञात पुजाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत औसा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सत्तरधरवाडी ता. औसा येथील एका पंधरा वर्षीय मुलीचा विवाह सारोळा येथील तरुणाशी दि १७ मे २०२० रोजी लावण्यात आला . या मुलीस सासर मंडळी कडून त्रास होत असल्याने तिने याची तक्रार थेट केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय संलग्न चाईल्ड हेल्पलाइन वर तक्रार नोंदवली होती.

याप्रकरणी संबंधित विभागाने याची गंभीर दखल घेऊन औसा पोलिसांना पत्र काढून चौकशी करण्याचे आदेश दिले. त्या नंतर पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे यांनी तपास सुरू केला . यात ग्रामसेवक यांच्या मार्फत चौकशी करण्यात आली, त्यावेळी लग्नादरम्यान या मुलीचे वय अल्पवयीन दिसून आले.

त्यामुळे सारोळा गावचे ग्रामसेवक धनंजय शहापुरे यांच्या फिर्यादीवरून हणमंत शिंदे (सासरा),शांताबाई शिंदे (सासू),दत्ता दंडगुले (मुलीचे वडील),शिवकांता दंडगुले(मुलीची आई),किरण शिंदे(नवरा),यल्लप्पा बंडगर(मध्यस्थ),गुरुबाई चव्हाण (आजी), तसेच लग्न लावणारा अनोळखी ब्राह्मण यांच्या सह आठ जणांविरुध्द गु. र. न.१०३ /२१ कलम ९ , १०, ११ , बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे .या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले तसेच पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे तपास करीत आहेत.

नांदेड जिल्ह्यात १ हजार २८८ कोरोना रूग्णांची भर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या