24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरवायबीएस संघटनेच्या अध्यक्षासह चौघांवर गुन्हा दाखल

वायबीएस संघटनेच्या अध्यक्षासह चौघांवर गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

लातूर : खोटे कागदपत्रे तयार करुन खुला प्लॉट स्वत:च्या नावावर केल्या प्रकरणी युवा भीमसेना संघटनेच्या अध्यक्षासह चौघांवर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगीतले, दि. १६ जुलै २०२२ रोजी कळंब तालुक्यात राहणा-या एका फिर्यादीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार युवा भीमसेना अध्यक्ष पंकज संभाजी काटे, राहणार अवंतीनगर, लातूर, मलिकार्जुन चनाप्पा शेटे, राहणार आमलेश्वरनगर, लातूर, अनिस नूरखॉ पठाण, राहणार पेठ तालुका लातूर व जब्बार सत्तार सय्यद, राहणार बोडका तालुका लातूर या चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद आरोपींनी आपसात संगनमत करुन लबाडीच्या इराद्याने, कपटाने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी हा प्रकार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

फिर्यादीच्या आईने १९८९ साली मयत चन्नाप्पा तुकाप्पा शेटे यांच्याकडून खाडगाव परिसरातील खुला प्लॉट विकत घेतला होता. सन २०१० मध्ये वरील नमूद आरोपींनी संगणमत करुन फिर्यादीच्या मयत आईच्या नावे असलेल्या प्लॉटच्या एन. ए. प्रतिवर खाडाखोड करुन बनावट सत्यप्रती तयार करुन ते मूळ दस्तऐवजाला जोडून गुन्ह्यातील आरोपी मलिकार्जुन चन्नाप्पा शेटे यांच्याकडून पंकज संभाजी काटे याने खरेदी केला. खोटे कागदपत्र व मूळ कागदपत्रात खाडाखोड करुन परस्पर जमिनीची विक्री खरेदी व्यवहार करुन फिर्यादीची फसवणूक केल्या प्रकरणी पोलीस ठाणे एमआयडीसी येथे नमूद आरोपींचा विरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८९/२०२२ कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

लातूर शहरातील व परिसरातील जमिनीचे दर वाढल्याने काही इसम संगणमत करुन खुल्या प्लटांचे, जागेचे खोटे बनावट कागदपत्र तयार करून जमिनी लाटण्याचा प्रयत्न करण्याचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे, असे चुकीचे गैरव्यवहार करणा-यांच्या विरोधात कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या