लातूर : प्रतिनिधी
दक्षिणेत असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शनिवारी झालेल्या मतमोजणीत काँग्रेस पक्षाकडे सत्तेचा कौल जनतेने दिला असून काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. सत्तेवर असलेल्या भाजपला कर्नाटक मतदारांनी नाकारले असून केंद्रातील मोदी सरकारच्या मन की बातला ठेंगा दिला आहे तर काँग्रेसच्या विजयात मोलाचा वाटा तेथील प्रदेश काँग्रेसची प्रचार यंत्रणा व मुद्दे जाहीरनामा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी प्रदेश काँग्रेसची नेते मंडळी देशपातळीवरील नेत्यांनी जी मेहनत घेतली त्यात त्यांना मोठे यश प्राप्त झाले
तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशभरात काढलेल्या पदयात्रा या भागांत ५६ मतदार संघात गेली त्याचाही फायदा या निवडणुकीत काँग्रेसला झाला आहे. हा कर्नाटकातील काँग्रेसचा विजय हा पक्षाला उभारणी देणारा असून आगामी काळात होणा-या लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्ता परिवर्तनाची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी माध्यमाला दिली आहे.