33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home लातूर अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमा

अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमा

एकमत ऑनलाईन

लातूर : राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील गोपनीय आणि संवेदनशील माहिती प्रसारित करणा-या अर्णब गोस्वामी यांची सखोल व पारदर्शक चौकशी होण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमा. या प्रकरणाची शहानिशा होईपर्यंत गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचा परवाना रद्द करुन ही वृत्तवाहिनी बंद करा, अशी मागणी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी येथे केली.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी काँग्रेस भवन येथे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर शहर जिल्हा व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवार दि. २२ जानेवारी रोजी काँग्रेस भवन येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार धिरज देशमुख बोलत होते. आमदार धिरज देशमुख म्हणाले, काँग्रेसने नेहमी देश जोडण्याचे, देश उभं करण्याचे काम केले आहे. सैन्याचे बळ वाढवण्याचे काम केले आहे. त्यामुळे देशविघातक कृती करणा-या अर्णब गोस्वामी यांसारख्या व्यक्तींना काँग्रेस नक्कीच धडा शिकवेल. ‘ब्रेकिंग न्युज’ च्या नावाखाली ते ‘नेशन ब्रेक’ करु पाहत असतील तर काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. अशा व्यक्तींविरोधात काँग्रेस दिल्लीपासून गल्लीपर्यंत आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही.

व्यक्ती कोण? हे महत्त्वाचे नाही देशहिताची गोपनीय माहिती उघड होणार असेल, त्यामुळे देशाचे नुकसान होणार असेल आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर अशा व्यक्तीची चौकशी झाली पाहिजे. अशा प्रकरणात ती व्यक्ती कोण आहे, कुठल्या विचारांची आहे, ती कुठल्या व्यवस्थेचा घटक आहे? हे विशेष नाही. त्याच्या कृतीमुळे काय घडले आणि काय घडू शकले असते? हा विषय अधिक महत्त्वाचा व गंभीर आहे. या प्रश्नाचे उत्तर आणि या प्रकरणात सहभागी व्यक्तींची नावे उघड करणे, हे आता केंद्र सरकारचे काम आहे. पंतप्रधानांनी या विषयावर आपली भूमिका मांडायला हवी, असे आमदार धिरज देशमुख यांनी सांगितले.

यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, तालूका काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब सवई, नारायण आबा लोखंडे, प्रा. सुधीर अनवले, स्वयंप्रभा पाटील, बादल शेख, अ‍ॅड. फारुक शेख, अ‍ॅड. प्रदीपसिंह गंगणे, सुपर्ण जगताप, दत्ता म्हस्के, युनूस मोमीन, रमेश सूर्यवंशी, महेश काळे, प्रवीण सूर्यवंशी, कैलास कांबळे, हकीम शेख, अमित जाधव, व्यंकटेश पुरी, किरण पवार, संजय ओहोळ, आसिफ बागवान, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील, हरीराम कुलकर्णी, मोहन सुरवसे, धनंजय शेळके, अब्दुल्ला शेख, अभिषेक पतंगे, अकबर माडजे, यशपाल कांबळे, प्रवीण कांबळे, प्रा. एम. पी. देशमुख, दगडूअप्पा मिटकरी, मनोज पाटील, सिकंदर पटेल, विजयकुमार साबदे, सुंदर पाटील कव्हेकर, रणधीर सुरवसे, प्रा. एकनाथ पाटील, मनोज देशमुख, हमीद बागवान, पंडित कावळे, पुनीत पाटील, सुनीत खंडागळे, कुणाल वागज, राजू गवळी, राहुल डुमणे, बालाजी झिपरे, श्रावण मस्के, मारुती बानाटे, हाजी मुस्तफा शेख, आदिल इनामदार, आशुतोष मुळे, पांडूरंग बोडके, विजय टाकेकर, विशाल कांबळे, संजय सूर्यवंशी, दिलीप भडंगे, गणेश ढगे, रमाकांत गडदे, बालाजी सोनटक्के, अभिजीत इगे, राम चामे आदी उपस्थित होते.

पुढं या, उत्तर द्या
बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती तीन दिवस आधीच गोस्वामी यांना कळली कशी? त्यांना ही माहिती कोणी दिली? हे जनतेला कळले पाहिजे देशाचे गृहमंत्री, संरक्षणमंत्री, माहिती प्रसारणमंत्री या तिघांच्या विभागांशी सबंधित हे प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित होत आहेत. त्यामुळे त्यांनी पुढं येऊन या विषयावर बोलले पाहिजे, असे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले. वृत्तवाहिनीची टीआरपी ही चांगल्या बातम्या प्रसारित केल्याने वाढते. चुकीच्या बातम्यांनी किंवा ‘व्हाट्स अप’ वरील चॅटने वाढत नसते, असेही ते म्हणाले.

ग्रा.पं.च्या रेकॉर्ड तपासणीसाठी आमरण उपोषण !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या