23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूरलातूर जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटिव्ह; तर एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित

लातूर जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटिव्ह; तर एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत सोमवारी एकूण 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 22 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह असून एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 3 जणांचे अहवाल अनिर्णित आले आहेत. एकाचा अहवाल रद्द करण्यात आला आहे आणि एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबीत आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 13 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 11 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तींचा अहवाल अनिर्णित आहे. एका व्यक्तींचा स्वॅब अयोग्य असल्याने त्याचा अहवाल रद्द करण्यात आला आहे.

उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयातून एकूण 13 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले असून त्यापैकी 10 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 2 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत. एका व्यक्तीचा अहवाल पाझिटिव्ह आला आहे. लातूरच्या कोविड केअर सेंटर येथुन 2 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते. त्यापैकी एका व्यक्तींचा अहवाल निगेटीव्ह आला असून एकाचा अहवाल प्रलंबित आहे. लातूर जिल्हयातील एकूण 28 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 22 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 3 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत. एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एका व्यक्तीचा अहवाल रद्द करण्यात आला आहे.तर एका व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे, अशी माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

Read More  लगाम पवारांच्या हाती, तरीही राज्य सरकार अपयशी- राजनाथ सिंह

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या