22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरखचलेल्या शेतकऱ्यांना धीर देणारा निर्णय - धिरज विलासराव देशमुख

खचलेल्या शेतकऱ्यांना धीर देणारा निर्णय – धिरज विलासराव देशमुख

एकमत ऑनलाईन

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी आणि पुरग्रस्तांसाठी 10 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत महाविकास आघाडी सरकारने आज जाहीर केली आणि खचलेल्या शेतकऱ्यांना धीर दिला. वेळ न घालवता तातडीने घेतलेल्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे आणि राज्य सरकारचे अभिनंदन. राज्य सरकार कायम शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभे आहे आणि यापुढेही सातत्याने उभे राहील.

अतिवृष्टीमुळे सोयाबीन, ऊस पिकासह बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी रस्ते खचले आहेत तर काही ठिकाणी शेतातील माती वाहून गेली. माझ्या मतदारसंघासह जिल्ह्यात आणि राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना या नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे शेतकरी खचला. शेतकऱ्यांचे, पुरग्रस्तांचे हे दुःख समजून घेत राज्य सरकारने आज पॅकेज जाहीर केले. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.

आगळगाव रोडवर भरदिवसा निवृत्त शिक्षाकाच्या डोक्यात दगड घालून खून

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या