30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home लातूर विना मास्क वावरामुळे २४ हजारांचा दंड

विना मास्क वावरामुळे २४ हजारांचा दंड

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : कोरोना या महाभयंकर रोगाने पुन्हा उचल खाल्ली असून रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अहमदपूर शहरात उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे , तहसीलदार प्रसाद कुलकर्णी व पोलीस विभागाच्या रामचंद्र केदार व नगरपरिषदेच्या कर्मचा-यांनी सोमवारी एका दिवसात मास्क न वापरणा-या नागरिकांकडून तब्बल २४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

अमदपूर शहरात सोमवारचा आठवडी बाजार असतो बाजारच्या दिवशी शहरांमध्ये प्रचंड गर्दी होती अनेक जण आपल्या तोंडाला मास्क न लावता फिरत असल्याचे आढळून आले यावेळी त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. येथे विना मास्क फिरणा-या नागरिकावर छत्रपती शिवाजी चौक व बसस्थानकाच्या समोर स्वत: अधिका-यांनी उभे राहून त्यांच्याकडून कठोर कार्यवाही करण्यात आली. मागच्या लॉकडाउनच्या काळात येथील नगरपरिषदेला एक लाख ४० हजार रुपयाची रक्कम मास्क न वापरणा-या नागरिकांच्या दंडातून मिळाली आहे.

या वेळी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तसीलदार प्रसाद कुलकर्णी, प्रशिक्षणार्थ उपविभागिय अधिकारी प्रमोद कुदळे, सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, रामचंद्र केदार आदीजन उपस्थित होते

चाकुरात ३८ जणांना दंड चाकूर शहरात विना मास्क फिरणा-या ३८ लोकांना पोलीस व नगर पंचायत यांच्या संयुक्त पथकांने कार्यवाही केली असून ३ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरानाचा पादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून सोमवारी शहरात नगर पंचायत व पोलीस ठाण्याच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली .३८ लोकांना विना मास्क आढळून आल्याने ३ हजार ८०० रूपयांचा दंड आकारण्यात आला. या पथकात नपचे अधीक्षक ठाकूर ,पोना. हणुमंत आरदवाड,पोकॉ.पाराजी पुठ्ठेवाड,गोरोबा जोशी यांच्या पथकांने ही कार्यवाही केली. पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली असून यापुढेही ही कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलिस निरिक्षक सिरसाठ यांनी सांगितले.

लातुरच्या प्रतिक फुटाणे ने केला विक्रम; एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या