24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरनिलंगा येथे ६९ हजार रुपयांचा दंड वसूल

निलंगा येथे ६९ हजार रुपयांचा दंड वसूल

एकमत ऑनलाईन

निलंगा : कोरोना महामारीवर प्रतिबंध घालण्यासाठी शहरात नियमाचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर कार्यवाही करण्यासाठी पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनाची संयुक्त मोहीम जोरात सुरू आहे या मोहिमेअंतर्गत मास्क न घातलेल्या , दुचाकीवर दबलसीट फिरणाºया व्यक्तीकडून व मोटार वाहन कायदा अंतर्गत दोन दिवसांत १५२ खटले दाखल करुन ६९ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असल्याने याचा संसर्ग वाढू नये म्हणून नागरिकांना प्रशासनाने सोशल डिस्टन्स, मास्क वापरावे, दुचाकीवरून डबलसीट प्रवास करुनये व दुकाने वेळेत बंद करण्यात यावे अशा सूचना वारंवार दिल्या होत्या. या अंमलबजावणीकरिता प्रशासनाने विनंती करुनही अनेक नागरिकांकडून नियमाची उल्लंघन होत असल्याने दि २१ व २२ जुलै रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक अनिल चोरमले, मुख्यधिकारी मल्लिकार्जुन पाटील यांच्यासह कर्मचाºयाच्या टीमने येथील शिवाजी चौक परिसरात रस्त्यावर उतरून कारवाई करण्यास सुरुवात केली.

यात शहरात डबल सीट फिरणाºया ८७ केसेस करून ४३ हजार ५०० रुपये तर मास्क न घातलेल्या तीन केसेस करून एक हजार पाचशे रुपये, दुकान वेळेत बंद न केल्याने एका दुकानदाराकडून दोन हजार रुपये व मोटार वाहन कायद्याअंतर्गत ६१ केसेस करून २२ हजार ९०० रुपये असे एकून दोन दिवसांत १५२ केसेस करून ५९ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामुळे विनाकारण बाहेर फिरणाºया , विना मास्क फिरणारे व दुचाकीचालकांवर डबलसीट प्रवास करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.

या कायवाईमुळे प्रशासनाचे शहरवाशियातून कौतुक केले जात आहे. या मोहिमेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक ढोणे, पोलिस हवालदार मारोती महानवर, विजयकुमार बिराजदार, दिपक थोटे, होमगार्ड उमाकांत सुर्यवंशी, नगरपालिकेचे कर्मचारी विक्रम ंिशदे, कृष्णा कांबळे, विठ्ठल कौडगावे, जफार अन्सारी, संदीप निटुरे, महादेव कांबळे, राम देशमुख आदींचा समावेश होता.

Read More  अजगर मारून फोटो व्हायरल करणे पडले महागात : ७ आरोपींना अटक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या