23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरआज ‘श्री’ स स्नेहपूर्ण निरोप

आज ‘श्री’ स स्नेहपूर्ण निरोप

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
गेली दहा दिवस ‘श्री’ ची मनोभावे आराधना केल्यानंतर आज दि. ९ सप्टेंबर रोजी ‘श्री’ स स्नेहपुर्ण निरोप दिला जाणार आहे. दोन वर्षांतील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोेत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरा करता आलेला नव्हता. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव ब-यापैकी ओसरल्याने मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यात १ हजार ७०० सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘श्री’ ची प्रतिष्ठापना केलेली आहे. गतवर्षी ४८८ ठिकाणी एक गाव एक गणपतीचा उपक्रम राबविण्यात आला होता. यंदा ३५६ ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यंदा दि. ३१ ऑगस्ट रोजी गणरायाचे वाजत-गाजत उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले होते. दहा दिवस मुक्कामी राहणा-या श्री गणेशाचे आज विसर्जन होईल. भक्तांकडून पारंपारिक पद्धतीने गणेश विसर्जन केले जाते. विसर्जन करताना प्रदूषण होऊ नये, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी विहिरी, तलाव व नद्यांमध्ये विसर्जन करु नये, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. गणेश भक्तांनी गणपतीचे विसर्जन न करता महानगरपालिकेस दान द्यावे, सर्व मुर्त्यांचे संकलन करुन त्या मुर्त्याचे विसर्जन महानगरपालिका योग्य ठिकाणी करेल, असे आवाहन महापालिका आयुक्त अमन मित्तल यांनी केले आहे. लातूर शहरात मागील तीन वर्षापासून मुर्तीदान हा उपक्रम सुरु आहे. मागील वर्षीही लातूरकरांनी प्रशासनास उस्फूर्तपणे सहकार्य केले होते. या वर्षीही गणेश भक्तांनी आपल्या गणेशमूर्ती पाण्यामध्ये विसर्जित करु नयेत यासाठी मनपाने संकलन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील १३ ठिकाणी अशी संकलन केंद्र उभारली जाणार आहेत.

सार्वजनिक गणेश मंडळे व घरात स्थापित केलेल्या गणेश मूर्तींचे संकलन या केंद्रांवर केले जाणार आहे.आज मनपाचे कर्मचारी मुर्ती संकलन केंद्रावर उपस्थित राहून मूर्तींचे संकलन करणार आहेत. प्रत्येक संकलन केंद्रावर निर्माल्य जमा करण्याची स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली आहे. शहरातील नागरिक व सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिका-यांनी स्थापित केलेल्या मूर्ती या केंद्रावर दान कराव्यात. पर्यावरण संवर्धन व प्रदूषण टाळण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी केले आहे.

मुख्य रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद
आज गणरायाचे विसर्जन होणार आहे. या निमित्ताने शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने मोठ्या मिरवणुका निघणार आहेत. या पार्श्वभुमीवर नागरिकांच्या सोयीच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने आज शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल यांनी काढले आहेत.

आज सकाळी १० ते रात्री ११.५० यावेळेत पीव्हीआर चौक ते दयानंद गेट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोकमान्य टिळक चौक, महात्मा गांधी चौक, हनुमान चौक तसेच स्वामी विवेकानंद चौक ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, गंजगोलाई, सुभाष चौक, दयाराम रोड, खडक हनुमान, श्री सिद्धेश्वर मंदीर हा मार्ग दुचाकी, बस, ट्रक, टेम्पो, टैक्सी, ट्रॅव्हल्स, मिनीडोअर अदी वाहनांसाठी बंद राहणार आहे. वाहतूकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. पीव्हीआर चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौक व शहरात येणा-या एस. टी. बसेस पीव्हीआर चौकातून रिंग रोडने नवीन रेणापूर नाका मार्गे जुना रेणापूर नाका येथील बसस्थानकावर जातील. उर्वरीत वाहने विकासरत्न विलासराव देशमुख मार्गावरुन जातील.

औसा रोडने शहरात येणा-या एस. टी. बसेस राजीव गांधी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एसटी डेपोमध्ये येतील. तसेच दुचाकी व तीन चाकी वाहने जुना औसा रोड, एलआयसी कॉलनी, नाईक चौक, सुतमील रोड या मार्गाचा वापर करतील. रेणापूर रोडने शहरात येणा-या एस. टी. बसेस जूना रेणापूर नाका येथील बसस्थानकात जातील. रेणापूर रोडने येणारी इतर वाहने जुना रेणापूर नाका, बाजाजी मंदीर तसेच खोरीगल्ली या मार्गाचा वापर करतील. नांदेड रोडने शहरात येणा-या एसटी बसेस या गरुड चौक, सिद्धेश्वर चौक, नवीन रेणापूर नाका, जुना रेणापूर नाका येथील बसस्थानकात जातील. शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी राजस्थान विद्यालय ते दयानंद गेट हा पर्यायी रस्ता असणार आहे. महात्मा गांधी चौक ते महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, रमा बीग, खोरीगल्ली, शिवनेरी हॉटेल या मार्गाचाही अवलंब करतील.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या