22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरलोकमान्य टिळक यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभारणी लवकरच

लोकमान्य टिळक यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभारणी लवकरच

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
येथील यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलात लोकमान्य टिळक यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारकाची उभारणी लवकरच केली जाईल. यासंदर्भात कला संचालनालय तसेच इतर सर्व मंजूरी प्रक्रिया पूर्ण झाली असून निधीदेखील उपलब्ध झाला असल्याची माहिती राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

लोकमान्य टिळक विचार मंचच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त दि. २३ जुलै रोजी लोकमान्य टिळक चौक येथे अभिवादन कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते. या कार्यक्रमास माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, विरोधी पक्षनेते दीपक सूळ, माजी नगरसेविका वर्षा कुलकर्णी, प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, माजी नगरसेवक अशोक गोविंदपुरकर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे,लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, माजी नगरसेवक रविशंकर जाधव, उत्तरादी मठाचे रघुत्तमाचार्य जोशी, लोकमान्य टिळक विचार मंचचे अध्यक्ष संजय निलेगावकर, संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब देशपांडे, सचिव प्राध्यापक जयंत शास्त्री, कोषाध्यक्ष शेषराव कुलकर्णी, धनंजय बोरगावकर, नरेंद्र कुलकर्णी, महादेव कुलकर्णी, व्यंकटेश पुरी, अ‍ॅड. फारुख शेख, गौरव काथवटे, आयुब मणियार, दत्ता सोमवंशी, गोरोबा लोखंडे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी,कार्यकर्ते, नागरिक लोकमान्य टिळक विचार मंचचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. यावेळी पापा कुलकर्णी यांचा आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात
आला.
पुढे बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, लोकमान्य टिळक त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी म्हणजे आपले लातूर शहर आहे. लातूरच्या भूमीच्या वैशिष्ट्यांनी त्यांना आकर्षित केले. त्यांची कर्मभूमी ही लातूर होती. लातूर ही बाजारपेठ आहे, याचा शोध लोकमान्य टिळकांना लागला. त्यांनी येथे उद्योग उभे केले. लातूर शहरात लोकमान्य टिळक यांची स्मारक उभे राहण्यासाठी मनपा पुढाकार घेत आहे, राज्यानेही मदत केली आहे. या परिसरात टिळकांना स्मारक शहरात उभे राहील या स्मारकासाठी निधी परवानगी मंजूर केले आहेत. या चौकाचे सुशोभीकरण नव्याने हाती घेतले पाहिजे. लोकनेते विलासराव देशमुख महसूलमंत्री असताना तत्कालीन नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे व तत्कालीन विरोधी पक्षनेते अशोक गोविंदपूरकर यांनी जळगाव पॅटर्न पाहून या ठिकाणच्या यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलाची उभारणी केली. बदलत्या युगामध्ये लातूर ही बदलेल.

महिलांना मोफत सीटी बस प्रवास देणारे देशातील पहिले शहर लातूर आहे. याची चर्चा देशभर झाली. लोकमान्य टिळक यांच्या नावाने लातूरात व्याख्यानाला सुरु करावी अशी सूचना त्यांनी संबंधितांना केली. लोकमान्य टिळकांनी लातूरमध्ये पहिला गणेशोत्सव साजरा केला तोच गणेशोत्सव आज जगभर साजरा केला जात असतो. मनपा निवडणुका तीन-चार महिन्यात होतील काँग्रेस सर्व चांगले उमेदवार देईल, लातूर हे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा विचारांचा वारसा असलेले शहर आहे. या शहराला गालबोट लागेल असे कृत्य माझ्या हातून घडले नाही आणि यापुढे घडणारही नाही, अशी ग्वाही त्यांनी देऊन राजमाता जिजाऊ मासाहेब, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु आदी महापुरुषांचे पुतळे लातूर शहरात उभारु, अशी ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, प्रा. बी.वी मोतीपोवळे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी नगरसेवक अशोक गोंिवदपुरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संजय निलेगावकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जयंत शास्त्री यांनी केले तर बाळासाहेब देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या